वैजापूरात "कन्या सन्मान दिनी "शालेय कन्या व महिलांची उस्फुर्त उपस्थिती - Vaijapur News

Breaking

Thursday, August 14, 2025

वैजापूरात "कन्या सन्मान दिनी "शालेय कन्या व महिलांची उस्फुर्त उपस्थिती

 
वैजापूर ता.१४
जिल्हाधिकारी श्री. दिलीप स्वामी यांच्या आदेशानव्ये गुरुवार (ता.१४)रोजी वैजापूर शहर व तालुक्यातील ११महसूल विभागाच्या मुख्यालयी "कन्या सन्मान दिन" मोठ्या उत्साह व आनंदात सम्पन्न झाला. आरोग्य विभाग,महिला बाल कल्याण विभाग, ग्रामविकास विभाग,पोलीस विभाग ,नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या दिनी शालेय कन्या यांना एक-एक झाडाचे रोपटे व सावित्रीबाई फुले पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. वैजापूर  येथे पंचायत समिती सभागृहात आ.रमेश पा,बोरनारे,उपविभागीय दंडाधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड,जिल्हा परिषद चे उप
मुख्यकार्यकारी अधिकारी  के.डी.ढोकणे,उप जिल्हा रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.एन, मोरे,तहसीलदार सुनील सावंत,गट विकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर, ऍड.श्री, पवार,सामाजिक कार्यकर्ते व माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत, नायब तहसीलदार श्री.कुमावत यांच्या हस्ते रोपटी व एक पुस्तक देऊन कन्यान सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी आ.बोरनारे म्हणाले की,मुलींचे जन्म प्रमाण वाढण्यासाठी आरोग्य विभाग,अंगणवाडी,शालेय स्तर 
यांच्या पातळीवर सर्वंकष प्रयत्न व्हावेत.उपजिल्हाधिकारी डॉ,अरुण जऱ्हाड यांनी गर्भलिंग निदान करू नये.मुलींच्या जन्माचे स्वागत करावे असे विशद केले,श्री. ढोकणे यांनीही मुली जन्म दर वाढण्यासाठी महिला प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे सूचित केले.धोंडीराम राजपूत यांनी ही मुलगा मुलगी समान समजावी, बेटी बचाओ-बेटी पढाओ अशा घोषणा देऊन मुलींना मुलां समान समजून त्यांच्या जन्माचे स्वागत करावे असे आवाहन केले.त्यांनी देहदान-अवयव दान,एड्स जनजागृती,सोनोग्राफीची विधायकता,महीलातील अंधश्रद्धा निर्मूलन ,वृक्षारोपण ,बालविवाह दुष्परिणाम यावर ही मार्गदर्शन केल. विद्या महाडीकर यांनी प्रास्ताविक केले.श्रीमती बोढरे,श्रीमती गायकवाड, श्रीमती रुख्मिनी गवई यांनी सहभाग नोंदविला. किशोर वाघुले यांनी सूत्र संचलन केले."शपथ तुमची आमची-स्त्री पुरुष समानतेची"ही शपथ सर्वांना राजपूत यांनी दिली ,वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी. एन. मोरे यांनी सर्वांना धन्यवाद दिले.स,गट,विकास अधिकारी अक्षय भगत, संरक्षण अधिकारी श्री कदम,विजय पाटील,श्री, चौधरी, शशिकांत पाटील,लक्ष्मीकांत दुबे,श्री. जगताप यांनी सहभाग नोंदविला.(फोटो कॅप्शन-कन्या सन्मान दिनी वैजापूरात कन्यांचा सन्मान)
 

No comments:

Post a Comment