महाराष्ट्र राज्यातील आकाशवाणी व रेडिओ श्रोत्यांचे
स्नेहसंमेलन १९व२०ऑगस्ट रोजी भोसले लाँन्स ,बुरुडगाव रोड,अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात
आलेले आहे. या संमेलनात राज्यातील ३०० रेडिओ श्रोते येतील अशी अपेक्षा आहे.या निमित्ताने या दोन दिवस भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. राज्यातील श्रोत्यांनी माळीवाडा बस स्टॅण्ड वर उतरावे तेथून कार्यक्रम स्थळ जवळ आहे.जे रेल्वे ने येणार आहेत ,त्यांनी रेल्वे स्टेशन वर उत्तरुन यावे.मंगळवार (ता,१९) रोजी आगमन, भोजन व मनोरंजन कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे.बुधवार (ता,२०) रोजी सकाळी नऊ पासून नावनोंदणी असणार या दिवशी रेडिओ रॅली ,उदघाटन,मनोगत,श्रोता परिचय असे विविध कार्यक्रम असणार आहे.असे उत्सव समितीचे आदिनाथ अन्नदाते,अशोक पाटील,बिरजू परदेशी यांनी कळविले आहे.त्यांना राजेश साबळे,धोंडीरामसिंह राजपूत, आप्पासाहेब जाधव सहकार्य करीत आहेत. या संमेलनात महाराष्ट्रातील जास्तीत-जास्त श्रोता समुदायानी उपस्थित रहावे असे समितीने आवाहन
केलेले आहे.(फोटो कॅप्शन-बुरूडगाव,येथील "भोसले लाँन "सज्ज आहे).
No comments:
Post a Comment