आंतरराष्ट्रीय अंगदान व अवयव दिनाच्या जनजागृती दिना निमित्त उपजिल्हाधिकारी कार्यालयात उपविभागीय दंडाधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड ,तहसीलदार सुनील सावंत ,गट विकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर,उपजिल्हा रुग्णालय, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी.एन. मोरे,जिल्हा आरोग्य समिती सदस्य व सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत,नायब तहसीलदार कुमावत यांच्या उपस्थितीत शहरातील कार्यालयीन प्रमुख व कर्मचारी यांची बुधवार(ता.१३)रोजी अंगदान व अवयव दान करण्यासाठी जन जागृती बैठक झाली.केंद्र व राज्य सरकार यांच्या द्वारे देशभर ही लोकजागृती चळवळ १५ऑगस्ट पर्यत चालू राहणार आहे.संभाजीनगर चे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यात पुढाकार घेऊन संपुर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती साठी सूचना केल्या आहेत. या बैठकीत धोंडीरामसिंह राजपूत यांनी देहदान ,(अंगदान)अवयव दान या बाबत सविस्तर माहिती दिली.बैठकीत उपस्थित असलेले तालुक्याच्या डोणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश साहेबराव डोखे यांनी व उपजिल्हारुग्णालय च्या मुख्य सेविका,रुख्मिनी गवई, व शेख उस्मान यांनी
देहदान फॉर्म लगेच भरून दिला.श्री ,धोंडीराम राजपूत यांनी हा फॉर्म भरून घेतला,प्रकाश डोखे यानी सदरील फॉर्म राजपूत यांच्याकडे सुपूर्द केला.उपविभागीय दंडाधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड यांनी त्यांचे अभिनंदन केले.ज्यांनी असे फॉर्म भरले आहेत ,त्यांचा सत्कार स्वातंत्र्यदिनी करणार आहे.असे
वैद्यकीय अधीक्षक डॉ.मोरे यांनी उपस्थिताना सांगितले.याच बैठकीत अंगदान व देहदान शपथ ही घेण्यात आली. या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालय क्ष -किरण तज्ज्ञ किशोर वाघुले, वाल्मिक जाधव,बाळू पवार ,बाबासाहेब पगार वाल्मिक वाघ, एस, टी.सिरसाट ,महेश शिंदे पाटील यांच्या सह अधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते(फोटो कॅप्शन--देहदान करणारे प्रकाश साहेबराव डोखे यांचा फॉर्म दाखल करताच त्यांचा सत्कार करतांना उपजिल्हाधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड,व ईतर)
No comments:
Post a Comment