अंगदान-- अवयवदान संजीवनी अभियान: हे लोकां--भिमुख -लोकचळवळ व्हावी--धोंडीरामसिंह राजपूत - Vaijapur News

Breaking

Thursday, August 7, 2025

अंगदान-- अवयवदान संजीवनी अभियान: हे लोकां--भिमुख -लोकचळवळ व्हावी--धोंडीरामसिंह राजपूत


वैजापूर-ता,०७
केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या द्वारे संपूर्ण देशात
३ऑगस्ट ते१५ऑगस्ट यादरम्यान अंगदान-अवयवदान
जनजागृती अभियान राबविल्या जात आहे,सरकारचे
हे अभियान  लोकचळवळ होण्यासाठी घराघरात हे अभियान पोहचावे व सर्वांनी देहदान-व अवयवदानासाठी उस्फुर्तपणे प्रयत्न व्हावे या साठी
आरोग्य खात्यातील कर्मचारी,अधिकारी, गावा-गावातील नागरिक,सामाजिक कार्यकर्ते व खाजगी मंडळे व संस्था यांनी सर्वंकष प्रयत्न करावे असे आवाहन जेष्ठ  सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा आरोग्य संमती सदस्य धोंडीरामसिंह राजपूत यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित  अंगदान-अवयवदान  जनजागृती कार्यक्रमात गुरुवार(ता,०७)रोजी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.एन. मोरे होते तर प्रमुख उपस्थितीत करमाड उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज डोंगळीकर व वैद्यकीय अधिकारी डॉ.साळवे,व डॉ,दिपमाला परदेशी होत्या.कार्यक्रमाचे आयोजक क्ष-किरण तज्ज्ञ वैद्यक किशोर वाघुले यांनी या अभियानाचे प्रास्ताविक केले.या कार्यक्रमात ग्रामीण व शहरी भागातील रुग्ण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्र संचलन किशोर वाघुले यांनीच केले तर आभार लक्ष्मीकांत दुबे यांनी केले.या प्रसंगी नर्सिंग अधिकारी आर.व्ही.गवई,श्रीमती जंगम सिस्टर,श्रीमती रोकडे,श्रीमती शिरीन,मनीषा मुळे, श्रीमती पाटील सिस्टर, आरोग्य सहायक,श्याम उचित,श्री,चौधरी,अर्चना धात्रक,कल्पना जाधव,पंकज कांबळे,विजय पाटील,शशिकांत पाटील,शेळके सिस्टर, पांडे सिस्टर,लघाने पाटील,वैभव चौधरी, श्री विनकर
यांनी सहभाग नोंदविला.जे नागरिक अवयव दान व अंगदान करतील त्यांचा व कुटुंबाचा सत्कार सन्मान  १५ऑगस्ट रोजी  राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री करणार आहेत तरी जास्तीत जास्त नागरिकांनी अवयव व अंगदान साठी पुढे यावे असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ.बी.एन. मोरे यांनी केले, आयोजक किशोर वाघुले यांचा विशेष सत्कार करण्यात आला(फोटो कॅप्शन-उपजिल्हा रुग्णालयात धोंडीराम राजपूत अंगदान व अवयव दान साठी आवाहन करतांना, व्यासपीठावर डॉ,मोरे,व डॉ.डोंगळीकर)
 

No comments:

Post a Comment