वैजापूर पोलिसांची कार्यवाही ,दुचाकी चोरांना पकडले - Vaijapur News

Breaking

Friday, September 20, 2019

वैजापूर पोलिसांची कार्यवाही ,दुचाकी चोरांना पकडले

वैजापूर पोलिसांनी दोन सराईत दुचाकी चोरांना अटक केली आहे . त्याच्या कडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. तोशिक शेख व रिझवान शेख रा. ओझर ता . निफाड असे आरोपी चे नावे आहेत . पोलीस निरिक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उप निरीक्षक शेख ,पोलीस नाईक जालिंदर तमणार यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार शहरातील पीर जादा गल्लीतून तीन दुचाकी अबरार शेख नावाच्या इसमाकडुन ताब्यत घेतल्या . त्यास विचारपूस केली असता सदरील दुचाकी ह्या ओझर ता .निफाड  त्याच्या नातेवाईक तोशिक शेख व रिझवान शेख यांनी आणल्या चे सांगितले . पोलीस पथकाने ओझर येथे जाऊन आरोपींचा शोध घेऊन आणखी दोन दुचाकी जप्त केल्या व आरोपीना जेरबंद करून वैजापूर येथे आणले . कोर्टाने आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे . 

No comments:

Post a Comment