नेत्याचे दैव कोणते ....... तर बूथ कार्यकर्ता -विजया रहाटकर - Vaijapur News

Breaking

Sunday, September 22, 2019

नेत्याचे दैव कोणते ....... तर बूथ कार्यकर्ता -विजया रहाटकर

वैजापूर - साई लॉन्स येथे आज भारतीय जनता पार्टी चा बूथ मेळावा संप्पन झाला . या मेळावा साठी केन्द्रीय निरीक्षक व महिला आयोग अध्यक्ष विजया रहाटकर हया उपस्थित होत्या . या प्रसंगी बोलतांना त्या म्हणाल्या कि नेत्याचे दैव कोणी असेल तर बूथ कार्यकर्ता आहे . यांच्या माध्यमातूनच नेत्याच्या राजकीय वाटचालीस वेग मिळतो त्या मुले प्रत्येक राजकीय नेत्याने बूथ कार्यकर्त्याला समजून घेतलं पाहिजे . त्या पुढे म्हणाल्या कि बूथ कार्यकर्ता हा नेत्या पर्यंत मर्यादित नसतो तर सरकार जे काम करते ते काम सामान्य नागरिका पर्यंत पोहचविण्याचे काम हे बूथ कार्यकर्त्याचे आहे व त्यानीं आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पडल्यामुळे आज केंद्रात पुन्हा मोदी सरकार विक्रमी मतांनी विजयी झाले . या प्रसंगी त्यानीं मोदी सरकार च्या १०० दिवसाचा विकास कामांचा पाढा वाचला व पुन्हा एकदा महाराष्ट्रात भाजप सरकार येणार असा विश्वास दाखविला .            या प्रसंगी भाजप चे जिल्हाअध्यक्ष एकनाथ जाधव ,शिल्पा परदेशी,राजूसिंग राजपूत ,कैलास पवार ,शैलेश चव्हाण, दशरथ बनकर ,प्रशांत कंगले ,कल्याण दागोडे ,तसेंच भाजपच्या महिला कार्यकर्त्या व नगरसेवक उपस्थित होते . 

No comments:

Post a Comment