आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कुलच्या ' यश देवरे ' ने घेतली गरुडझेप - Vaijapur News

Breaking

Monday, September 30, 2019

आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कुलच्या ' यश देवरे ' ने घेतली गरुडझेप



प्रतिनिधी :
 क्रिडा व शैक्षणिक संकुल म्हणून देशभरात नावाजलेल्या आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कुल मधील विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात दैदिव्यमान कामगिरी करून शाळेच्या नावलौकिक भर पाडली आहे. या वेळी ही भारत सरकार  मानव संसाधन विभाग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला त्यात सी.बी.एस. ई. ची 'यश देवरे' याने घवघवीत यश संपादन केले त्याचा या यशा बद्दल आत्मा मालिक माऊली,संत परमानंद महाराज,व समस्त विश्वात्मक परिवार,संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, कोषाध्यक्ष विठ्ठल होन ,सरचिटणीस हनुमंतराव भोगळे, चेअरमन कांतीलाल पटेल,मुख्याध्यापक नामदेव डांगे,उपमुख्याध्यापिका वंदना थोरात,व्यवस्थापक सुरेश शिंदे तर मार्गदर्शन शिक्षक पल्लवी भोंगळे ,अश्विनी तोडकर,प्रवीण कदम सुमित पाटील व सर्व शिक्षक वृद यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment