मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला कीर्तनकार इंदुरीकर महाराज उपस्थित होते, त्यामुळे ते राजकारणात येत आहेत की काय अशी चर्चा सुरू झाली.
संगमनेरच्या सभेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक लाख रुपयांचा धनादेश दिला. तिथून ते परतले पण इंदुरीकर महाराज भाजपमध्ये प्रवेश करणार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात निवडणूक लढणार, अशी चर्चा समाजमाध्यमांमध्ये सुरू झाली.
यातलं सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही इंदुरीकर महाराजांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
इंदुरीकर महाराज निवडणूक लढणार नाही, असं त्यांच्या प्रवक्त्यांशी बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्ट केलं.
"इंदुरीकर महाराज आमदारकीचं तिकीट घेणार नाही. बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात निवडणूक लढणार नाही. कोल्हापूर-सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून 1 लाख रुपये देण्यासाठी महाराज तिथं गेले होते. बाकी दुसरं काहीच कारण नव्हतं," असं इंदुरीकरांचे प्रवक्ते किरण महाराज शेटे यांनी सांगितलं.
No comments:
Post a Comment