औरंगाबाद, : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘मतदार जनजागृती’ चित्ररथाचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पवनीत कौर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा माहिती अधिकारी, मुकुंद चिलवंत, आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे. 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून सर्वांनी न चुकता मतदानाचा हक्क बजवावा असेही आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले. यावेळी जनजागृती करण्यासाठी बनविण्यात आलेल्या चित्ररथाची फित कापुन आणि हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले.…
No comments:
Post a Comment