शेवटच्या दिवशी वैजापूर विधानसभा मतदारसंघातुन किती अर्ज आले .. २४ उमेदवारांनी ३३ अर्ज दाखल केले. - Vaijapur News

Breaking

Friday, October 4, 2019

शेवटच्या दिवशी वैजापूर विधानसभा मतदारसंघातुन किती अर्ज आले .. २४ उमेदवारांनी ३३ अर्ज दाखल केले.


अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वैजापूर विधानसभा मतदारसंघातुन २४ उमेदवारांनी ३३ अर्ज दाखल केले. यात १९ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रहार जनशक्ती, वंचित आघाडीतर्फे पाच उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे अभय पाटील चिकटगावकर यांना उमेदवारी देण्यात आली असुन त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. संदिपान सानप यांच्याकडे नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यांच्यासोबत माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, अँड प्रताप निंबाळकर उपस्थित होते. शिवसेनेतर्फे प्रा. रमेश बोरनारे, वंचित आघाडीतर्फे प्रमोद नांगरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे संतोष जाधव, प्रहार जनशक्तीतर्फे ज्ञानेश्वर घोडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, अकिल शेख, डॉ.राजीव डोंगरे, विजया डोंगरे, बाबासाहेब पगारे, विश्वास पाटील, सिताराम उगले, कैलास खंडागळे, माधवराव पैठणे, कचरु पवार, अरविंद पवार, जगन्नाथ जाधव, लक्ष्मण पवार, अविनाश गलांडे, संतोष तागड, दशरथ बनकर, अशोक बागुल, चंद्रकांत कटारे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. पाच ऑक्टोबर रोजी छाननी करण्यात येणार असुन ७ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील अशी माहिती सहायक निवडणुक निर्णय अधिकारी विनोद गुंडमवार यांनी दिली. 




No comments:

Post a Comment