सारीपाट चित्रपटाच्या माध्यमातून मराठवाड्यातील कलावंतांना संधी दिली -दिग्दर्शक संजय राजूरकर - Vaijapur News

Breaking

Saturday, October 5, 2019

सारीपाट चित्रपटाच्या माध्यमातून मराठवाड्यातील कलावंतांना संधी दिली -दिग्दर्शक संजय राजूरकर

अष्टांग मुव्हीज व भारतवाला फिल्मस निर्मित सारीपाट या चित्रपटाच्या पोस्टर प्रदर्शित चा कार्यक्रम लासूरगाव येथील देवी दाक्षायणी मंदिर संस्थान चे अध्यक्ष कल्याण मुनोत व डॉ . देवदत्त म्हत्रे यांच्या हस्ते संप्पन झाला . या प्रसंगी सारीपाट चित्रपटाचे दिग्दर्शक संजय राजूरकर म्हणाले कि मराठवाडयातील कलावंतांना चित्रपटा मध्ये काम मिळविण्यासाठी खुप प्रयत्न करावे लागतात . प्रयत्न करूनही कधी कधी संधी मिळत नाही . परंतु सारीपाट च्या माध्यमातून आम्ही कलावंतांच्या कला गुणांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे . याप्रसंगी चित्रपटाचे मुख्य कलाकार साहेबराव पाटील ,फकिरा वाघ ,कोमल शिर्क ,  जयसिंग राजपूत ,रमेश बनसोड ,गीतकार -गायक रमेश भालेराव ,प्रा . पंजाबराव मोरे, कला दिग्दर्शक-संतोष गायकवाड ,शैलजा कुलकर्णी ,अनिल उगले ,संजय बनसोडे ,शंभू राजे  आदी हजर होते 

No comments:

Post a Comment