महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत २१ तारखेला मतदान होणार आहे . ४ तारीख हि अर्ज भरण्याची शेवट ची तारिख होती . तर ७ तारखेला अर्ज माघार घेण्याची मुदत आहे . पूर्ण महाराष्ट्र मध्ये इच्छुक उमेद्वारांना पक्षा चे तिकीट न मिळाल्यामुळे त्यानी बंडखोरीचे हत्यार उपसले आहे . यात वैजापूर तालुका सुध्दा अपवाद नाही . युती ,आघाडी ,वंचित ,मनसे या सर्व पक्षाच्या उमेद्वारांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे . व ज्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली त्यानी सुध्दा उमेदवारी अर्ज भरलेला आहे . हि पक्षाच्या विरोधात बंडखोरी केलेली आहे . या मध्ये एकनाथ जाधव ,डॉ दिनेश परदेशी ,विश्वास पाटील . शेख अकील यांचा प्रामुख्याने समावेश आहे . ७ तारीख हि अर्ज माघार घेण्याची मुदत आहे . मागील दोन दिवसापासून वैजापूरातील राजकीय समुद्रामध्ये चर्चेची भरती चालू आहे कि जर बंडखोर उमेदवारांनी जर निवडणूक लढवली तर कुणाचा विजय होईल किंवा माघार घेतली तर त्याच्या राजकीय वाटचालीचे काय . हाच मुद्दा आज तरी लोकांच्या चर्चेचा आहे पण लवकरच याचे उत्तर मिळणार .
Sunday, October 6, 2019

बंडखोर उमेदवार माघार घेणार का .. निवडणूक लढविणार .. - जनतेच्या चर्चेतील विषय .
Tags
# Vaijapur
Share This
About Kiran Rajput
Vaijapur
Labels:
Vaijapur
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
Kiransingh Rajput
No comments:
Post a Comment