चीनी फटाके विक्री केली तर होणार मोठा दंड. - Vaijapur News

Breaking

Tuesday, October 22, 2019

चीनी फटाके विक्री केली तर होणार मोठा दंड.

आपल्या देशातील दिवाळीत मोठ्या प्रमाणात चीनी फटाके नेहमीच विक्री करण्यात येते. परंतू दिवाळी जवळ येताच आता या फटाक्यांशी संबंधित कठोर दिशा निर्देश प्रशासनाने दिले आहेत. त्यामध्ये विशेष करत चीनी फटाक्यावर प्रशासनाने प्रतिबंध आणले असून, चीनी फटाके विक्रीवर सीमा शुल्क आयुक्तांनी बंदी आणली आहे. तरीही कोणी चीनी फटाके विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करणार आहेत.

सीमा शुल्क विभागाचे प्रमुख आयुक्तांनी स्पष्ट केले की, सांगितले की देशात चीनी फटाके आयातीवर प्रतिबंध आहे आणि जर कोणताही व्यक्ती यासंबंधित व्यवसाय करतो किंवा चीनी फटाके ठेवल्यास, विकल्यास, लपवल्यास किंवा खरेदी केल्यास त्यांना अधिनियम 1962 अंतर्गत दंडित करण्यात येईल.

No comments:

Post a Comment