औरंगाबादेत दोन पॉझिटिव्ह ; 38 कोरोनाबाधित*
औरंगाबाद, दिनांक 22 (जिमाका) : समता नगरातील दोघा जणांची कोविड चाचणी मंगळवारी रात्री उशीरा पॉझिटिव्ह आल्याने आता औरंगाबादेतील कोरोनाबाधितांची संख्या 38 झाली आहे.
कोविड चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या समता नगरातील दोन्ही पुरूष रुग्णांचे वय 51 आणि 25 आहे. सध्या ते महानगरपालिकेच्या एमजीएम स्पोर्टस् कॉम्पलेक्स येथील कोविड केअर सेंटरमध्ये आहेत. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या दोन्ही रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) येथे संदर्भीत करण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
*****
No comments:
Post a Comment