*तीन नवीन कोरोना रुग्णांची भर*
औरंगाबाद, दिनांक 21 (जिमाका): कोविड 19 चा संसर्ग झालेल्या तीन नवीन कोरोना रुग्णांची कोविड 19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यामुळे या आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 35 झाली असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले. तर जुन्या दोन रुग्णांची दुसरी चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे.
मिनी घाटीमध्ये एकूण 47 रुग्णांची आज तपासणी झाली. त्यापैकी 24 जणांना घरीच अलगिकरणात राहण्याचा सल्ला दिला. 36 जणांच्या लाळेचे नमुने घेऊन घाटीतील प्रयोगशाळा येथे पाठवण्यात आले आहे. 31 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 7 जणांचे अहवाल येणे बाकी आहेत. आताच्या नवीन तीन रुग्णांसाह सध्या 15 कोरोनाबाधित रुग्णांवर विलगिकरण कक्षात उपचार सुरू आहेत, तर देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या 28 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले.
*घाटीत जुन्याच दोन कोविड रुग्णांवर उपचार सुरू*
आज 21 रोजी दुपारी 04 वाजेपर्यंत 26 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 04 जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यातील एक निगेटिव्ह आहे, तर तीन रुग्णांचे अहवाल येणे अपेक्षित आहे. सध्या घाटीच्या डेडिकेटेड कोविड रुग्णालयात (DCH) दोन कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण 25 जण DCHमध्ये भरती आहेत, असे घाटीचे नोडल अधिकारी (माध्यम समन्वयक) डॉ.अरविंद गायकवाड यांनी सांगितले.
*जिल्हयात आतापर्यंत 35 कोरोनाबाधित*
जिल्ह्यात आजपर्यंत 35 कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत. 35 पैकी एकूण 15 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तीन जणांचा मृत्यू झाला. सध्या मिनी घाटीत 15 कोरोनाबाधितांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. घाटीत एकूण दोन कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
****
No comments:
Post a Comment