ऑन लाईन नसलेल्या कार्ड धारकांना धान्य उपलब्ध करून देण्यात यावे. आमदार रमेश बोरणारे यांची पालकमंत्री यांना व्ही सी वरून मागणी. - Vaijapur News

Breaking

Saturday, April 25, 2020

ऑन लाईन नसलेल्या कार्ड धारकांना धान्य उपलब्ध करून देण्यात यावे. आमदार रमेश बोरणारे यांची पालकमंत्री यांना व्ही सी वरून मागणी.

 औरंगाबाद चे पालक मंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधीकारी यांची मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरणसिंग द्वारें बैठक घेतली.या बैठकीत लोकप्रतिनिधींनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉक डाऊन मुळे उदभवलेल्या समस्या पालक मंत्री देसाई यांच्या समोर मांडली.                                                 या प्रसंगी वैजापूर चे आमदार रमेश बोरणारे यांनी पालक मंत्रीशी चर्चा करतांना सांगितले की वैजापूर तालुक्यातील ज्या रेशन कार्ड धारकांनी आपले नाव ऑनलाईन नोंदविले आहे त्यानाच रेशन चा माल मिळत आहे परंतु ज्या कार्ड धारकांनी काही कारणास्तव कार्ड ऑनलाईन केले नाहीत त्या कार्ड धारकांना माल मिळण्यास अडचणी येत आहे. त्या मुळे जे कार्ड धारक ऑनलाईन नाहीत त्यांनां सुध्दा धान्य उपलब्ध करून दिले जावे तसेच शासकीय कापूस खरीदी शासनाने लवकर चालू करावी. 

1 comment:

  1. दमदार राजा माणुण तालुक्यास आपल्या सारखे वैभव लाभले

    ReplyDelete