वैजापूर शहरात गेल्या १२-१३दिवसापासून संचारबंदी
असल्याने व दिव्यांग व त्यांचे पालक यांना घराबाहेर
निघता येत नसल्याने रविवार(ता,०५)रोजी नगरपालिका व सामाजिक संस्था निर्मला इन्स्टिट्यूट च्या वतीने नगर पालिकेत असलेल्या दिव्यांग नोंदीच्या पहिल्या यादीतील २७दिव्यांग यांना त्यांच्या दारावर जाऊन स्वच्छतादूत धोंडिरामसिंह राजपूत यांच्या हस्ते
दहा किलो तांदूळ,पांच किलो गहू, एक किलो साखर,तेल,मसाला,डाळ,फिनेल बाटली,साबण, इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले,शहराच्या विविध भागात हे दिव्यांग विखुरलेले आहे, त्या सर्वांचा दारी जाऊन हे साहित्य त्यांना प्रदान करण्यात आले,या समयी नगर पालिकेच्या मुख्य आरोग्य सेविका निर्मला
जाधव,मुख्य आरोग्य अनुरेखक अशोक गाडेकर,मुख्य
लिपिक जयंपालसिह सिसोदिया, तर निर्मला इन्स्टिट्यूट या संस्थेच्या नॅन्सी रोद्रीग्ज,जासमीन ताई,
सय्यद इरफान,विनिका राजपूत,तसेच पालिकेचे परेश आसर,गणेश टिभे,ए,सी,एन चॅनलचे किरण राजपूत,
श्री राऊत,यांनी यात सहभाग नोंदबीला,दिव्यांग छोटी
मुलगी चुनौती रणजित राजपूत,दिव्यांग राजेंद्र नवले, दिव्यांग फिजा सय्यद यांना त्यांच्या पालकांसमोर हे साहित्य वाटप केले दिव्यांगाची आजी मालतीबाई,
आई सविता राजपूत,बाळासाहेब पवार, इत्यादि उपस्थित होते यानंतर स्वच्छता दूत यांनी नागरिकांना घरातच थांबण्याचे,तोंडावर मास्क लावण्याचे,हात वारंवार साबणाने धुण्याचे व शासन सूचना पाळण्याचे
आवाहन केले,(फोटो कॅप्शन-छोटी दिव्यांग चुनौती राजपूत ला दारावर साहित्य देताना धोंडिरामसिंह राजपूत, नॅन्सी रोद्रीग्ज,जसमीन ताई,जयपाल राजपूत,निर्मला जाधव,व विनिका राजपूत)
No comments:
Post a Comment