२० ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व महाविद्यालय चालू होणार..* - Vaijapur News

Breaking

Thursday, October 14, 2021

२० ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व महाविद्यालय चालू होणार..*

२० ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व महाविद्यालय चालू होणार..*
 
आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कॉलेज सुरु करण्याबाबत एक महत्त्वाची घोषणा केली असून त्याबद्दल काही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.राज्यातील कॉलेज ५०% पटसंख्या उपस्थितीत राहून सुरू केले जाणार - तसेच लसीचे दोन डोस पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच कॉलेज मध्ये प्रवेश मिळणार आहे.
 यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं संपूर्ण लसीकरण होऊ शकलं नाही - अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येईल - तसेच अशा विद्यार्थ्यांसाठी कॉलेजकडून विशेष शिक्षणाची व्यवस्था करण्यात येईल 
महत्वाचे म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे  - अशा जिल्ह्यांसाठी वेगळी नियमावली असणार आहे.
कोरोनाची नियमावली पाळून वसतिगृह सुरु करण्यात येतील - कॉलेज मध्ये  शिक्षक, शिक्षकेवर कर्मचारी यांचं संपूर्ण लसीकरण होणं महत्त्वाचं आहे.

No comments:

Post a Comment