महाराष्ट्राची बदनामी सहन केली जाणार नाही* -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Vaijapur News

Breaking

Saturday, October 23, 2021

महाराष्ट्राची बदनामी सहन केली जाणार नाही* -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

*महाराष्ट्राची बदनामी सहन केली जाणार नाही* 
                                         -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून आज औरंगाबाद खंडपीठाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केले जाणार असून ते औरंगाबाद येथे दाखल झाले आहे. 

यावेळी मुख्यमंत्र्यांबरोबरच केंद्रीय कायदे व न्याय मंत्री किरण रीजीजू , सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन.व्ही रमण्णा, पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार इम्तियाज जलील, मंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, तसंच विविध लोकप्रतिनिधी आणि महत्त्वाचे वरिष्ठ अधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
औरंगाबादला येताच त्यांनी ड्रग्ज कारवाईवरुन महत्वाचे विधान केले. जसे काही जगभरातील ड्रग्ज महाराष्ट्रातच सापडत आहे असे एकप्रकारे चित्र निर्माण केले जात आहे. 
महाराष्ट्र व महाराष्ट्रातील पोलिसांचे नाव बदनाम प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो कदापी खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना दिला.
 पुढे बोलतांना ते म्हणाले की, जसे काही संपूर्ण जगभरातील ड्रग्ज फक्त महाराष्ट्रातच सापडते, असे दाखविले जात आहे. अशा प्रकारचे काम एक विशिष्ट टीम करू शकत नाही. यातून राज्य सरकारचीही जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे हे आम्ही खपवून घेणार नाही.

No comments:

Post a Comment