वैजापूर ता,२८
तालुका विधी सेवा समितीच्या वतीने "आझादीका अमृत महोत्सव "अंतर्गत पालिकेच्या जेष्ठ नागरिक सभागृहात (हुतात्मा स्मारक)जेष्ठ नागरिक महिलांसाठी कायद्याचे मार्गदर्शन शिबिर बुधवार(ता,२७)रोजी घेण्यात आले,या शिबिराच्या अध्यक्षस्थानी येथील जिल्हा सत्र
न्यायालयाच्या महिला न्यायधीश न्या,श्रीमती पी,टी,शेजवळ(काळे)होत्या तर सत्र न्यायालयाने जेष्ठ न्यायधीश न्या, मोइनोद्दीन शेख हे प्रमुख अतिथी होते
या द्वयांनी जेष्ठ नागरिक महिलांना त्यांच्या अडीअडचणी समयी असणारे कायदे या विषयी माहिती देऊन महिलांनी न्यायासाठी या कायद्यांचा आधार घ्यावा असे आवाहन केले, न्या,श्रीमती काळे
यांनी महिलांना वृद्धापकाळातिल समस्या बाबत ही सविस्तर मार्गदर्शन केले,तहसीलदार राहुल गायकवाड यांनी जेष्ठ नागरिकांनी आनंदी,सुखी व समृद्ध जगावे,जीवन हे आनंदाने जगण्यासाठी असते,जेष्ठां-
नी स्वतःला कामात सतत ठेवावे असे ही ते म्हणाले या कार्यक्रमाचे आयोजन उत्कर्ष जेष्ठ महिला नागरिक सेवा संघ,जायंट्स ग्रुप ऑफ सहेली व यंग सहेली यांनी केले होते,या प्रसंगी प्रथम भारतमाता पूजन करण्यात आले,प्रास्ताविक अंजली जोशी यांनी
केले,या प्रसंगी न्यायधीश न्या ,आहेर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती तसेच कार्यक्रमात वकील संघाचे अध्यक्ष ऍड राजेंद्र हरिदास,सचिव ऍड सय्यद अली,जेष्ठ नागरिक कारभारी गायकवाड,से,नि, पोलीस उप निरीक्षक सोपानराव निकम,जेष्ठ नागरिक संघाचे काशिनाथ गायकवाड,रवींद्र साखरे,सहसचिव धोंडिरामसिंह राजपूत,अशोक धसे, बबन क्षिरसागर, वैजीनाथ मिटकरी,मंदाताई तांबे, ऍड महेश कदम
महिला जेष्ठ नागरिक संघाच्या अर्चना राका,अनघा आंबेकर,वैशाली साखरे,सुनीता साखरे, योगिता साखरे,आदी महिला उपस्तीत होत्या
No comments:
Post a Comment