औरंगाबाद महानगरपालिकेत आता ११ नगरसेवकांची पडणार भर. - Vaijapur News

Breaking

Saturday, October 30, 2021

औरंगाबाद महानगरपालिकेत आता ११ नगरसेवकांची पडणार भर.

*औरंगाबाद महानगरपालिकेत आता ११५ ऐवजी १२६ नगरसेवक होणार* 
*११ नगरसेवकांची पडणार भर.*_ 
 _सध्या अस्तित्वात असलेल्या वॉर्डांच्या सीमारेषा आणि वॉर्डांची नावे बदलणार असून प्रत्येक वॉर्डाचे क्षेत्रफळ कमी होणार._ 
_लोकसंख्या व मतदारांची संख्यादेखील कमी होणार._ 
कोरोना महामारीमुळे २०२१ मध्ये जनगणना झाली नाही परंतु लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग लक्षात घेतला तर भविष्यामध्ये औरंगाबादची लोकसंख्या १४ ते १६ लाखांच्या आसपास येईल. एवढ्या लोकसंख्येसाठी १२६ किमान आणि जास्तीत जास्त १५६ नगरसेवक करता येईल.
औरंगाबाद शहराच्या वाढीव लोकसंख्येनुसार महापालिकांमध्ये नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी (ता. २७) घेतला. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेत नगरसेवकांची संख्या ११५ वरून १२६ वर जाणार आहे. 
नवे वॉर्ड तयार होणार असल्याने सध्या अस्तित्वात असलेल्या वॉर्डांच्या सीमारेषा आणि वॉर्डांची नावे देखील बदलणार आहेत. तसेच प्रत्येक वॉर्डाचे क्षेत्रफळ कमी होईल, वॉर्ड लहान आकाराचे होतील. लोकसंख्या व मतदारांची संख्यादेखील कमी राहणार आहे. 
महापालिकेची आगामी निवडणूक त्रिसदस्यीय प्रभागरचनेनुसार होणार आहे. त्यामुळे तीन वॉर्डांचा एक प्रभाग होईल. ४२ प्रभागांचा विचार करता एका प्रभागाची लोकसंख्या सरासरी २९ हजार असेल. त्यात १० टक्के वाढीची आणि १० टक्के कपातीची देखील तरतूद ठेवण्यात आली आहे
 *११ वॉर्ड या भागात वाढण्याची शक्यता* 
नवीन वाढीव सदस्यांच्या अनुषंगाने प्रभाग तयार होणार असून प्रत्येक झोन कार्यालयाच्या क्षेत्रात एक नवीन वॉर्ड तयार होईल तर दोन झोन कार्यालयांच्या क्षेत्रात प्रत्येकी दोन वॉर्ड नव्याने तयार होतील.
सातारा-देवळाई, पडेगाव, मिटमिटा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, हर्सूल, नारेगाव, मसनतपूर, चिकलठाणा, मुकुंदवाडी, भीमनगर-भावसिंगपुरा या भागांचा वॉर्ड वाढविताना विचार होणार आहे.

No comments:

Post a Comment