आजपासून शहरातील बहुतेक महाविद्यालये सुरु झाली आहेत. मात्र शासन निर्देशानुसार कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच वर्गात प्रवेश असेल. या पार्श्वभूमीवर आता महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची तपासणी करून ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नाही अशा विद्यार्थ्यांची यादी तयार करा असे पत्र शहरातील सर्वच महाविद्यालयांना पाठवले असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
ज्या विद्यार्थ्यांनी अजून पर्यंत लसीचा एकही डोस घेतलेला नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयातच मनपाकडून लसीकरण शिबिर राबवण्यात येणार आहे. त्यासाठी महाविद्यालयांनी लवकरात लवकर यादी तयार करून पाठवावी. असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात येत आहे. यासोबतच रेल्वेस्टेशन, बसस्थानक येथे ध्वनीक्षेपकावरून लसीकरणाचे आवाहन केले जाणार आहे.
No comments:
Post a Comment