वैजापूर ता१४
राज्यातील परिस्थिती लक्षात घेता येथील पोलीस स्टेशन मध्ये शांतता समितीची बैठक रविवार(ता,१४)रोजी संपन्न झाली, या समितीत तहसीलदार राहुल गायकवाड,उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापति,माजी नगराध्यक्ष डॉ,दिनेश
परदेशी ,माजी नगराध्यक्ष राजुसिंह राजपूत, ऍड,प्रतापराव निंबाळकर,,रवींद्र पाटणी(खंडाळा)उपसरपंच परसोडा श्री छानवाल,शकील मिस्त्री,अमीरअली ,यांनी शहंर व तालुक्यातील नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखून
कोणत्याही अफवेला बळी न पडण्याचे आवाहन केले,
तसेच ग्रामीण भागातील ग्राम सुरक्षा दल,व शहर भागातील वॉर्ड सुरक्षा दल सक्षम करून रात्रीचे पॉईंट निश्चित करून तेथे पोलीस राउंड ठेवावा अशी मागणी
केली, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचलन धोंडिरामसिंह राजपूत यांनी केले आभार पोलीस नाईक संजय घुगे यांनी मानले,या प्रसंगी शहरे काझी
हाफीजुद्दीन, अखिल शेख, नगरसेवक प्रकाश चव्हाण,दशरथ बनकर,गणेश खैरे,हाजी इम्रान,तसेच
प्रेमसिंह राजपूत,सुधीर लालसरे, धर्मेंद्र त्रिभुवन,श्री,पगारे, काशीनाथशेठ गायकवाड,सुलतान कुरेशी,कैलास पवार, राजू काझी,परसोडा येथील मौलाना,खंडाळा येथील उपसरपंच,तसेच जानराव,इत्यादी उपस्थित होते,या सर्वांनी गावात व शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आश्वासन दिले,
Good job
ReplyDelete