औरंगाबाद दि 15 (जिमाका) जिल्ह्यामध्ये विशेष लसीकरणाची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी.लसीकरण झाले तर जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होईल असे त्यामुळे सर्व नागरिकांनी लसीकरणाच्या विशेष मोहिमेला प्रतिसाद देऊन लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. आज संध्याकाळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कागजीपुरा, खुलताबाद, सुलीभंजन तसेच वेरूळ येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला आणि अधिकाधिक लसीकरण करण्याचे आवाहन यावेळी केले. यावेळी कागजीपुराच्या सरपंच श्रीमती नसरीन कुरेशी, उपसरपंच शेख अहमद, सुलीभंजनचे सरपंच इलियास युनूस, उपसरपंच श्रीमती रुपाली घोडके तसेच गावकरी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सरपंच आणि उपसरपंच यांना आवाहन केले की आपल्या गावातील सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण करून घ्यावे. ज्या गावात लसीकरण अल्प प्रमाणात होईल त्या गावांना अनेक सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागेल. ज्या गावात लसीकरण शंभर टक्के पूर्ण होईल त्या गावाला अधिकचा निधी देण्यात येईल.याशिवाय अशा गावाला विविध माध्यमातून मदत करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीमती संगीता सानप, उपविभागीय अधिकारी श्री विधाते, तहसीलदार श्री देशमुख तसेच सरपंच आणि उपसरपंच उपस्थित होते.
Monday, November 15, 2021

लसीकरणाची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
Tags
# औरंगाबाद
Share This
About Kiran Rajput
औरंगाबाद
Labels:
औरंगाबाद
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
Kiransingh Rajput
No comments:
Post a Comment