लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असलेले वृत्तपत्र व पत्रकार तसेच समाज माध्यम यांची भूमिका लोकशाही शासन प्रणालीत अत्यंत प्रभावी असते ,त्यांनी गावाच्या व शहराच्या विकासासाठी सातत्य पूर्ण लिहून निःपक्षपातीपणे व कणखर पणे आपले कर्तव्य पार पाडावे तरच ही लोकशाही टिकेल असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यीक व येथील न,प, च्या वैजीनाथ वाचनालयांचे वाचक धोंडिरामसिंह राजपूत यांनी केले,राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात मंगळवार(ता,१६)रोजी ते बोलत होते,न,प,च्या वाचनालयाचे वाचक वर्ग व जेष्ठ नागरिक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, आरंभी जेष्ठ वाचक
शरद जोशी,कृष्णराव कांबळे,बबन क्षीरसागर,व सुभाष चाफेकर ,धोंडिरामसिंह राजपूत से,नि, पोलीस निरीक्षक सोपानराव निकम ,यांनी दर्पणकार बाळ शास्त्री जांभेकर
यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,ग्रंथपाल संजय राजपूत,या नंतर जेष्ठ वाचक यांनी उपस्थित पत्रकार घनश्याम वाणी,समीर लोंढे,मकरंद कुलकर्णी, विलास म्हस्के,राहुल त्रिभुवन, मन्सूर अली किरण सिह राजपूत, यांचे पुष्प देऊन सत्कार केला जेष्ठ वाचक भागीनाथ त्रिभुवन,बबनराव क्षीरसागर, साहेबराव पडवळ, काशीनाथ मिस्तरी,कांशीराम राजपूत,दिगंबर गायकवाड,राजेंद्र आहिरे,इकबालसिंह खनिजो,के, एन,क्षीरसागर,जे, बी,दौड, वाल्मिकी मोरे, बाबुराव जगताप,बी,एन,क्षीरसागर,यांनी पत्रकारांना
पुष्प देऊन शुभेछा दिल्या कार्यक्रमाची प्रस्तावना व संचालन तसेच आभार धोंडिरामसिंह राजपूत यांनी मानले,
No comments:
Post a Comment