माजी आमदार कै,आर,एम,वाणी यांनी स्थापन केलेल्या आधार जेष्ठ नागरिक सेवा संघाचे दिवाळी स्नेहमीलन रविवार(ता,१४)रोजी येथील संत तुकाराम
सभागृहात अत्यंत आनंद व उत्साहात संपन्न झाले,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यीक व स्वच्छतादूत धोंडिरामसिंह राजपूत होते,ते जेष्ठांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की,जेष्ठांचे जीवन हणजे आयुष्याची संध्याकाळ होय,ही संध्याकाळ आनंदी,उत्साही ,व निरोगीपणे घालविण्यासाठी जेष्ठांनी आपल्या कुटुंबात संयम,सामंजस्य,व सर्वसमावेशक भूमिका स्वीकारावी,जीवनाच्या या सायंकाळी आपला अनुभव आपल्या उराशी बाळगून सर्वांशी जुळवून घेऊन राहावे,",असेही ते पुढे म्हणाले,या प्रसंगी व्यासपीठावर वैजापूर चे पोलीस पाटील सर्वात जेष्ठ नागरिक गुलाबराव साळुंके,अली
अहमद,पोपटराव भोसले व संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब शेळके, यांची उपस्थिती होती, कोरोना च्या दोन वर्षे च्या काळानंतर ही जेष्ठ नागरिकांची पहिलीच बैठक होती,आरंभी या काळात जे स्वर्गवासी
झाले,त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली,संघाचे कोषाध्यक्ष आसाराम निकम यांनी खरा तो एकची धर्म
ही प्रार्थना सादर केली, उपाध्यक्ष उत्तमराव साळुंके यांनी प्रास्ताविक केले,तर जेष्ठ पत्रकार व संघाचे सचिव घनश्याम वाणी यांनी आभार मानले,या नंतर सर्व जेष्ठांनी गप्पा -टप्पा करीत आनंदाने दिवाळी चा फराळ सेवन केला,या प्रसंगी,बापू वाणी, दगु वाणी,रंजक शेटे,नारायण लाडवाणी,भागीनाथ निकम,वैजीनाथ मिटकरी,सेवा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक सोपानराव निकम,प्रा,डी,एस, गायकवाड,कृष्णराव कांबळे,बापू गावडे,उगले बापू,व जेष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते,शहरातील
जेष्ठ नागरिकांचे दिवाळी मिलन चा हा पहिलाच कार्यक्रम होय,
No comments:
Post a Comment