वैजापूर ता,२७
दरवर्षी कन्नड तालुक्यातील श्री क्षेत्र शिवेश्वर संस्थान वाकी देवाची येथील शिवस्वरूप नारायण बाबा यांची
दिंडी आळंदी ला जाते ,हे त्यांचे विसावे वर्ष आहे या निमित्ताने शिवेश्वर भक्त बापूसाहेब गावडे यांनी या भक्त भाविकांचा शनिवार(ता,२७)रोजी कोरोनाचे नियम पाळत त्यांचा फराळ पाणी देऊन यथोचित सन्मान केला ,या प्रसंगी आपल्या अमृत वाणीतून हं,भ,प, काटकर महाराज यांनी उपस्थित भक्त भाविकांना परमेश्वराच्या चिंतनात सदोदित राहून मानिभावें सेवा करावी असे संबोधित केले,सामाजिक
कार्यकर्ते धोंडिरामसिंह राजपूत यांनी शिवस्वरूप नारायण महाराज यांच्या अदभुत साक्षात्कार ची अनुभूती देऊन उपस्थित भक्त भाविकांना माता पित्याची मनोभावे सेवा करण्याचा उपदेश केला,परमेश्वर च्या नामचिंतनात खरी सुख, शांती मिळते असेही ते म्हणाले,या प्रसंगी बापू गावडे,रवींद्र गावडे ,यांनी हं,भ,प,काटकर महाराजांचे पूजन केले,या प्रसंगी जेष्ठ नागरिक साहेबराव नांगरे पाटील,भाऊसाहेब जगताप,उल्हास पा,साळुंके,बाबुराव गावडे, शिवाजी गावडे,सुधाकर साळुंके,रामकीसन जोरे पाटील,से,नि, पोलीस अधिकारी सोपानराव निकम,घनश्याम वाणी,दगु वाणी
इत्यादी मान्यवर उपस्थित होते,पुढे निरोप घेऊन ही दिंडी आळंदी कडे रवाना झाली,
No comments:
Post a Comment