वैजापूर ता,२३
वैजापूर शहरातील सर्व पात्र नागरिकांचे १००टक्के कोविड-१९लसीकरण व्हावे म्हणून नगराध्यक्षा शिल्पा
ताई परदेशी,उपनगराध्यक्ष साबेरखान,मुख्याधिकारी भागवत बिघोत(राजपूत) व सर्व नगरसेवक यांनी "मिशन कवच कुंडल"व हर घर दस्तक या अंतर्गत सोमवार(ता२२)पासून घरोघरी जाऊन लस घेणारे व लस न घेणारे यांचे सर्व्हेक्षण आरंभ केले आहे, व शहरात रिक्षा फिरवून लस घेण्याचे जाहीर आवाहन करून मोठ्या प्रमाणात जन जागृती आरंभ केली आहे, याचा परिणाम असा होत आहे की,पालिकेच्या भगवान महावीर रुग्णालयात लसीकरण साठी प्रचंड गर्दी होत आहे,मंगळवार(ता,२३)रोजी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली, आज या ठिकाणी स्वछतादूत धोंडिरामसिंह राजपूत यांनी नागरिकांना
लस घेण्याचे महत्व सांगितले ,शेजारी-पाजारी याना ही लस घेण्यास प्रवृत्त करा असे आवाहन त्यांनी केले,वैद्यकीय अधिकारी डॉ,सविता निकाळे,मुख्य परिचारिका निर्मला जाधव,अंगणवाडी शिक्षिका सुरेखा वैराळ,सुरेखा जाधव,अशोक गाडेकर,दादासाहेब दळे, हे सर्व सहकार्य करीत आहेत,गत दोन दिवसात दोन हजारच्या वर नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे,सर्व नगरसेवक आपल्या प्रभागात जाऊन प्रत्येक घरी"दस्तक", देऊन लसीकरण करून घेण्याचे आवाहन करीत आहेत,लवकरच वैजापूर शहर १००टक्के लसीकरनाचे लक्ष्य गाठेल असे प्रयत्न वैजापूर पालिकेचे दिसून येत आहेत,
No comments:
Post a Comment