एस टी कर्मचाऱ्यांची निलंबनामुळे प्रकृती खालावली - Vaijapur News

Breaking

Friday, December 3, 2021

एस टी कर्मचाऱ्यांची निलंबनामुळे प्रकृती खालावली

एस टी कर्मचाऱ्यांची निलंबनामुळे प्रकृती खालावली    वैजापूर- मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे एसटी कर्मचारी हे विलगीकरण्याच्या मुद्यावर ठाम असून शासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कर्मचारी करीत आहे.     या संपामुळे कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे निलंबनाच्या धास्तीने महाराष्ट्रात काही कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला तर काही कर्मचाऱ्यांनी आपले जीवन संपविले याच पार्श्वभूमीवर वैजापूर येथील एका दीपक तुपे एस.टी . कर्मचाऱ्यांची प्रकृती  निलंबन झाल्यानंतर अचानक खालावली  असून ते चालक या पदावर आहे त्यांना कुटुंबातील सदस्यांनी तात्काळ खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले , कर्मचाऱ्याच्या कुटुंबाशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की काही दिवसांपूर्वी त्यांचे निलंबन करण्यात आले होते निलंबनानंतर सदरील कर्मचारी हा प्रचंड तणावाखाली होता व आज अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना वैजापूरच्या मतसागर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment