जागतिक दिव्यांग दिन(अपंग दिन) दिव्यांगांचा सन्मान - Vaijapur News

Breaking

Friday, December 3, 2021

जागतिक दिव्यांग दिन(अपंग दिन) दिव्यांगांचा सन्मान

जागतिक दिव्यांग दिन(अपंग दिन) दिव्यांगांचा सन्मान
वैजापूर ता,०३
दिव्यांगांचा(अपंग)सन्मान करून त्यांना सन्मानाने जगात यावे म्हणून त्यांना शासनाने व समाजाने सन्मानाची वागणूक देणे ही काळाची गरज आहे,असे प्रतिपादन समाजकार्यकर्ते व स्वछतादूत धोंडिरामसिंह राजपूत यांनी शुक्रवार(दि०३)रोजी जागतिक दिव्यांग दिनी संकट मोचन हनुमान मंदिर समोर दोन्ही पायांनी
अधू असलेले कारभारी रिठे यांचा सन्मान करताना केले,कारभारी रिठे ३की,मी तिडी येथून हाताने तीन चाकी सायकल चालवीत येतात व मंदिर समोर बसून भक्त भाविकांना कपाळावर ओम टिळा लावून जि दक्षिणा मिळेल त्यावर आपला व पत्नीचा उदरनिर्वाह
करतात,राजपूत पुढं म्हणाले की"दिव्यांगांचा मान हाच
देशाचा सन्मान आहे"दिव्यांगना सर्वतोपरी सहकार्य करून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न
व्ह्यावेत ,या प्रसंगी सुनील लाडवणी,साक्षी दाभाडे या द्वयांनी रिठे चा सन्मान केला ,या समयी स्वातंत्र्य सैनिक कृष्णराव कुंदे,अनिकेत जगताप,आर, बी,रत्नपारखी,श्री चांदने उपस्थित होते,या सन्मानाने रिठे यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू आले,

No comments:

Post a Comment