वैजापुरत राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवच्या पूर्व संध्ये निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन - Vaijapur News

Breaking

Thursday, January 11, 2024

वैजापुरत राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवच्या पूर्व संध्ये निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 
वैजापूर ता,११
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता-राष्ट्रमाता माँ जिजाऊ मासाहेब यांच्या जन्मोत्सव निमित्त जिजाऊ ब्रिगेड व मराठा सेवा संघ च्या वतीने बुधवार (ता,१०)रोजी हुतात्मा स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा दीपोत्सव करण्यात आला, तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात घेण्यात आहे,भाषण स्पर्धा, विविध वेशभूषा, तसेच स्वतः चा उद्योग स्वतः उभारून स्वावलंबी बनणाऱ्या उद्योजकाना स्मृती चिन्ह,व प्रमाण पत्र ही प्रदान करण्यात आले,गुणवंत व आदर्श मातांचा गौरव ही करण्यात आला,आरंभी माजी आमदार भाऊसाहेब पा,चिकटगावकर,तहसीलदार सुनील सावंत ,माजी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत पा, सदाफळ,सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी राष्ट्रमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले, यांच्या प्रतिमाना अभिवादन केले,जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा
अर्चना ताई शिंदे, जयश्री जगदाळे,उमरा खंडागळे,श्रुती मोटकर यांनी जिजाऊ वंदना सादर केली,आपल्या प्रस्तावनेत जयश्री जगदाळे यांनी जिजाऊ ब्रिगेड चे उल्लेखनीय कार्य सादर केले,शहराच्या विविध शाळांतून आलेल्या मुलां-मुलींनी आपल्या विविध वेशभूषेतून कला सादर केल्या,भाषणे केली, त्यांना प्रशस्ती पत्र देण्यात आली, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा अर्चना शिंदे यांनी शहर व तालुक्यातील महिलांचे सक्षमीकरण व्हावे,त्या धीट व्हाव्यात,व्यवहार ज्ञान त्यांना व्हावे म्हूणन विविध उपक्रम राबविण्यात येतात असे विशद केले ,या प्रसंगी
मा,आ,भाऊसाहेब पा,चिकटगावकर,तहसीलदार सुनील सावंत यांनी ही समयोचित भाषण केले,या प्रसंगी भाजपा च्या महिला जिल्हा प्रमुख जयमाला वाघ,शिवसेना महिला आघाडीच्या सुलभाताई भोपळे,नगरसेविका अनिता तांबे,सुप्रिया व्यवहारे,शोभा भुजबळ,पद्मा साळुंके,मंजुषा ढाकरे,
सौ,जया महाडिक,सुशीला घायवट,भारती कदम,श्री,महाजन,साईनाथ मतसागर याच्या सह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते,सूत्र संचलन  उमरा खंडागळे व स्मृती मोटकर यांनी केले तर आभार जिजाऊ ब्रिगेडच्या अर्चना शिंदे यांनी मानले,(फोटो कॅपशन-राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सव निमित्त पूर्व संध्येवर उपस्थित माजी आ,भाऊसाहेब पा,चिकटगावकर,तहसीलदार सावंत, धोंडीराम राजपुत,मोती वाघ,अर्चनाताई शिंदे,सौ,भोपळे,भारती कदम,व विजयी स्पर्धक)

No comments:

Post a Comment