विद्यापीठ नाम विस्तार दिन वैजापूरात उत्साहात संपन्न - Vaijapur News

Breaking

Sunday, January 14, 2024

विद्यापीठ नाम विस्तार दिन वैजापूरात उत्साहात संपन्न


वैजापूर ता१४
डॉ,बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराला ३०वर्ष होत आहेत या निमित्त शहरातील विविध थरातील मंडळीनी रविवार(ता,१४)रोजी सकाळी साडेदहा वाजता डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर  एकत्र येऊन डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार टाकून हा नामविस्तार दिन  मोठ्या उत्साहात  साजरा केला,या प्रसंगी भारत सरकारचे सामाजिक न्याय विभाग राज्य मंत्री ना,रामदासजी आठवले यांनी ही या कार्यक्रमात सहभाग नोंदविला व नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी,  जे, के,जाधव,तालुका अध्यक्ष रिपाई बाळासाहेब त्रिभुवन,यांनी प्रथम डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले ,भाजपा शहर अध्यक्ष दिनेश राजपूत,पत्रकार संघ चे सुनील त्रिभुवन,दीपक बरकसे, किरणसिंह राजपूत,धोंडीरामसिंह राजपूत, राजेश गायकवाड,श्री शिंदे,साहेबराव पडवळ,आरपीआय उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे,सुभाष त्रिभुवन, प्रवीण खाजेकर,प्रहार चे गणेश सावंत,बाबासाहेब गायकवाड,कॅप्टन अशोक हंगे यांच्या सह नागरिक उपस्थित होते,सूत्र संचलन ठा, धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले आभार सुनील त्रिभुवन यांनी मानले,(फोटो कॅप्शन-डॉ,बाबासाहब आंबेडकर मराठवाडा नाम विस्तार दिनी  पुतळ्याला अभिवादन करतांना केंद्रीय मंत्री ना,आठवले,शिल्पाताई परदेशी,दिनेश राजपूत व ईतर)

No comments:

Post a Comment