येथील निर्मला इन्स्टिट्यूट व निर्मला मागासवर्गीय मुलींचे वस्तीगृह दरवर्षी मकर संक्रांत निमित्त तालुक्यातील ग्रामीण भागातील शालेय मुलां-मुलींचे विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करीत असते याची वर्षी ही सामाजिक बांधिलकी जपत रविवार(ता,१४)रोजीतालुक्यातील शिवराई,कविटखेडा
, म्हस्की अनचलगाव,बोरसर,बेलगांव,रोटेगाव, वैजापूर ग्रामीण,इंदिरानगर,खंडाळा येथील शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईल दुष्परिणाम, टी, व्ही,दुष्परिणाम, पाणी वाचवा,अंधश्रद्धा निर्मूलन, वृक्षारोपण, स्वच्छता, से नो टू प्लास्टिक इत्यादी बाबत गीत गाऊन,मूक अभिनय,नाटिका, गीते,नृत्य सादर करून जन जागृती केली,या प्रसंगी या विद्यार्थ्यांना डॉ,प्रतिमा सोनवणे,शिक्षण विस्तार अधिकारी मनीष दिवेकर,माजी,जि,प,सदस्य सपना पवार,माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली, आयोजिका निर्मला मागास मुलींचे वस्तीगृह तथा निर्मला इन्स्टिट्यूट च्या नॅन्सी रोद्रीग्ज,मार्गारेट,लिलीयन ताई
,इरफान सय्यद,छाया बंगाळ यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला,शेवटी नॅन्सी यांनी आभार मानले,(फोटो कॅप्शन--यशस्वी कलाकारांना बक्षीस वाटप करतांना -डॉ,सोनवणे,धोंडीराम राजपूत,नॅन्सी,
छाया बंगाळ व मार्गारेट)
No comments:
Post a Comment