वैजापूर येथे विकसित भारत संकल्प यात्रेतनागरिकांनी घेतली विविध योजनांची माहिती - Vaijapur News

Breaking

Monday, January 15, 2024

वैजापूर येथे विकसित भारत संकल्प यात्रेतनागरिकांनी घेतली विविध योजनांची माहिती

 
वैजापूर ता,१५
देशांतील गोर,गरीब,दीन, दुबळे,बेघर,आर्थिक दुर्बल,दिव्यांग,मागासवर्गीय यांचा सर्वांगीण विकास हाच देशाचा खरा विकास आहे ,या साठी केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प  यात्रेतील विविध
जनकल्याणकारी योजनांची जन जागृती व्हावी म्हणून निघालेली "विकसित भारत संकल्प यात्रा"ही वरदान ठरणार आहे,असे प्रतिपादन तालुक्याचे आमदार प्रा,रमेश पा,बोरनारे,व  भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष डॉ,दिनेश परदेशी यांनी या यात्रेचे उदघाटन करताना पालिका प्रांगणात आयोजित कार्यक्रमात सोमवार(ता,१५)रोजी केले,प्रधानमंत्री आवास योजना(शहरी),पीएमस्वनिधी  योजना,आभा आरोग्य कार्ड , दिव्यांग निधी या योजनांचा लाभ,राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान जास्तीत जास्त गरजू पर्यंत पोहचावा व त्यांचा विकास व्हावा हा या यात्रेचा उद्धेश आहे असे ते म्हणाले,या कार्यक्रमाची सविस्तर माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी भागवत बिघोत(राजपूत) यांनी दिली तर सूत्र संचलन व आभार पालिका स्वच्छतादूत धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले,चित्रफितीचे उदघाटन आ,रमेश पा,बोरनारे,डॉ,दिनेश परदेशी,सौ,शिल्पाताई परदेशी, भागवत बिघोत राजपूत यांच्या उपस्थितीत झाल्या नंतर सर्व लाभार्थी व गरजूना चित्रफिती च्या माध्यमातून केंद्र सरकारच्या सर्व योजना ची माहिती देण्यात आली,या  विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ तालुक्यातील महालगाव येथून झाला ,या प्रसंगी माजी पं,स,सभापती बाबासाहेब जगताप,भाजपा तालुका अध्यक्ष नारायण कवडे, कृषी उत्पन्न समिती संचालक प्रशांत त्रिभुवन,शिवसेना शहर प्रमुख पारस घाटे,नगरसेवक स्वप्नील जेजुरकर
वसंत त्रिभुवन, भाजपा महिला आघाडी च्या जयमालाताई वाघ,माधुरी बनकर, सुप्रिया व्यवहारे,उपमुख्याधिकारी राहुल साठे, प्रकल्प अभियंता मयूर मोदानी,प्रकल्प अधिकारी सुनील भाग्यवंत,समूह संघटक दिवाकर त्रिभुवन,व्यवस्थापक
सूर्यकांता काकडे,अनिल पठाण,अमोल निखाडे,महेश गायकवाड,भांडारपाल वाल्मिक शेटे,जयपाल राजपूत,विनोद शिनगारे  ,डॉ,सविता निकाळे, निर्मला जाधव,मंजिरी खैरे व पालिका कर्मचारी उपस्थित होते,(फोटो कॅप्शन--आ,बोरनारे लाभार्थी ना संबोधित करतांना, शेजारी डॉ,दिनेश परदेशी,बाबासाहेब जगताप,प्रशासक भागवत बिघोत, धोंडीराम राजपूत)

No comments:

Post a Comment