इंधनाची बचत ही बस चालक व यांत्रिक कर्मचारी यांचे आद्य कर्तव्य होय - Vaijapur News

Breaking

Tuesday, January 16, 2024

इंधनाची बचत ही बस चालक व यांत्रिक कर्मचारी यांचे आद्य कर्तव्य होय


वैजापूर ता,१६
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस वर होणारा खर्च हा एकूण खर्चाच्या ४०टक्के आहे, हा खर्च इंधन बचत करून कमी करता येऊ शकतो यासाठी बस चालक व यांत्रिक विभागातील कर्मचारी यांनी बस च्या प्रत्येक बाबीवर व्यवस्थित लक्ष देऊन आपले कर्तव्य पार पाडले तर हा खर्च निम्यावर येऊन
महामंडळाची आर्थिक स्थिती उंचावून कर्मचारी वर्गाला ही याचा आर्थिक लाभ होऊ शकतो असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी  मंगळवार(ता,१६)रोजी येथील बस आगारात आयोजित  इंधन बचत मासिक कार्यक्रम १६ जानेवारी २०२४ -ते१५फेब्रुवारी२०२४ चे उदघाटन करताना केले, या प्रसंगी  अध्यक्षस्थानी आगार प्रमुख
किरण धनवटे होते,तर प्रमुख उपस्थितीत एसटी विभागाचे अधिकारी अ, ल,घोडके, अविनाश पायकवंडे,अंबादास घोडके,नवनाथ बोडखे, श्री पेहरकर, तसेच आगारातील यांत्रिक विभागातील कर्मचारी,चालक व कर्मचारी उपस्थित होते,या समयी इंधन बचत बाबत उपस्थितांनी इंधन बचत चा संकल्प ही केला,(फोटो कॅप्शन-इंधन बचत मासिक कार्यक्रम उदघाटन करतांना धोंडीरामसिंग राजपूत,किरण धनवटे,अ, ल,घोडके,नवनाथ बोडखे ,पेहरकर व इतर)

No comments:

Post a Comment