वैजापूर गुरुद्वारात गुरू गोबिंदसिंघजी जयंती निमित्तविविध कार्यकम उत्साहात - Vaijapur News

Breaking

Tuesday, January 16, 2024

वैजापूर गुरुद्वारात गुरू गोबिंदसिंघजी जयंती निमित्तविविध कार्यकम उत्साहात


वैजापूर ता,१७
येथील गुरुद्वारात बुधवार(ता,१७) रोजी  शिखांचे दहावे गुरू  आणि खालसा पंथाचे संस्थापक गुरू गोबिंदसिंगजी यांच्या जयंती निमित्त शहरातून त्यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली,गुरुद्वारात
गुरुवाणी,लंगर महाप्रसाद व  भक्ती गीते गायन,गुरुवाणी गायन  असे भरगच्च कार्यक्रम उत्साहात पार पडले,या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते ठा,धोंडीरामसिंग राजपूत यांनी सक्रिय सहभाग नोंदविला, गुरुद्वारात जाऊन त्यांनी  गुरू गोबिंद सिंगजी प्रतिमा पूजन केले व त्यांच्याजयंती निमित्तउपस्थितांना शुभेच्छा ही दिल्या व गुरुजींच्या मानवतेच्या शिकवणुकीचा जीवनात अवलंब करावा असे उपस्थित माता-भगिनी व बंधूंना आवाहन केले,या प्रसंगी गुरू ग्यानसिंग पोथीवाल,दिलजीतसिंग खनिजो,रमेश पंजाबी,नंदकुमार आहुजा,राजेंद्र कुमार 
आहुजा, गुरुमित ग्रंथी(गुरू वाणी वाचक),अमर आहुजा, बलविंदर पोथीवाल,सुमित पोथीवाल,गुरु ज्योत खनिजो,इमप्रीत  खनिजो,प्रीतीकौर खनिजो, ज्योती आहुजा ,संतोष प्रसाद,यांनी सक्रिय सहभाग नोंदविला,(फोटो कॅप्शन-गुरू गोबिनदसिंग जयंती निमित्त गुरुद्वारात अभिवादन करताना धोंडीरामसिंग राजपूत,दिलजीतसिंग खनिजो,नंदकुमार आहुजा आणि इतर),

No comments:

Post a Comment