वैजापूर ता,२०
मोजक्या शब्दात--मोजक्या विचारांची --मोजक्या गुणात्मकतेची सूत्रबद्ध काव्यात्मक व भावात्मक अर्थपूर्ण रचना म्हणजे कवीता होय असे भावपुर्ण प्रतिपादन जेष्ठ साहित्यक व कवी धोंडीरामसिंह राजपूत यांनी शनिवार(ता,२०)रोजी येथील श्यामचंद्र कॉम्प्लेक्स च्या करिअर अकॅडमी सभागृहात केले,निमित्त होते सत्तरी ओलांडलेल्या नव कवियत्री श्रीमती शुभदा चव्हाण यांच्या पहिल्याच "संस्कार-शिदोरी"या काव्यसंग्रहाचे, राजपूत "संस्कार शिदोरी "या काव्य संग्रह प्रकाशन समयी या कवितांवर भाष्य करीत होते, ते पुढे म्हणाले की,कविता म्हणजे कवींच्या मनांतील काव्यरूपी भावाची अनुभव संपन्न रचना होय,शुभदा चव्हाण यांनी आपल्या ७०व्या वर्षी १०१कविता लिहून मी या वयातही शब्दांची व्यवस्थित काव्य रचना करून विविध विषयांच्या माध्यमातून संस्कार व नीतिमूल्ये समाज मनात रुजवू शकते हे सिद्ध केले, या बद्धल राजपूत यांनी त्यांच्या काव्यरूपी लिखाणाचे तोंड भरून कौतुक केले व आणखी दर्जेदार लिखाण त्यांच्या कडून अपेक्षित केले, महाराष्ट्रातील प्रत्येक घरात या कवितांचे वाचन झाले तर ढासळत असलेले संस्कार निश्चितपणे सावरून माणुसकी जोपासल्या जाईल असेही राजपूत यांनी विशद केले,त्यांनी बऱ्याच कविता गाऊन ही दाखविल्या,वर्ड लँड पब्लिशिंग हाऊस, छत्रपती संभाजीनगर
या संस्थेचे मालक प्रकाशक बाबा चन्ने यांनी हे पुस्तक
काढण्यात पुढाकार घेऊन ७० री ओलांडलेल्या नवलेखिका शुभदा चव्हाण यांना प्रोत्साहित केले,या प्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ,अशोक सरोदे होत त्यांनी चव्हाण यांच्या या काव्यातील योग व प्राणायम वर लिहिलेल्या कविता प्रत्यक्ष आचरणात आणण्याचे उपस्थिताना आवाहन केले, तर जेष्ठ साहित्यिक ग्रामीण कथाकार डॉ,भीमराव वाघचौरे
यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित करण्यात आले,त्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व श्रीमती चव्हाण यांच्या साहित्यीक प्रवासाला शुभेच्छा दिल्या व आणखी साहित्य लिहावे अशी अपेक्षा केली ,या प्रसंगी माजी उपप्राचार्य डॉ,के, बी,साळुंके, कवी,डॉ,जी,के, ढमाले,सीताराम म्हस्के,बी,बी,थोरात, प्रा,श्री, शिंदे,प्रा,श्री, निकम ,यांच्या सह श्रोते व नवं साहित्यिक उपस्थित होते,मुखपृष्ठ रेखाटक नितीन मोरे यांचाही सत्कार करण्यात आला,सूत्र संचलन कवी अशोक हिरे यांनी केले,आभार,राजेंद्र चव्हाण व जितेंद्र चव्हाण यांनी मानले, बाबा चन्ने यांनी कार्यक्रम घडवून आणण्यात पुढाकार घेतला राजेंद्र चव्हाण,वर्षा चव्हाण, सागर ,जोहेबखान,हर्षदा गाढे,ऋतुजा गाढे,वर्षा गाढे यांनी परिश्रम घेतले,(फोटो कॅप्शन--संस्कार शिदोरी या काव्य संग्रहाचे प्रकाशन करताना डॉ,भीमराव वाघचौरे,डॉ,अशोक सरोदे,धोंडीराम राजपूत,कवयित्री शुभदा चव्हाण,बाबा चन्ने व कवी हिरे),
No comments:
Post a Comment