वैजापूरात जेष्ठ नागरिकांचा "तीळ गुळ घ्या--गोड गोडबोला" कार्यक्रम उत्साहात - Vaijapur News

Breaking

Sunday, January 21, 2024

वैजापूरात जेष्ठ नागरिकांचा "तीळ गुळ घ्या--गोड गोडबोला" कार्यक्रम उत्साहात



वैजापूर ता,२१
स्व,आर,एम, वाणी यांनी स्थापन केलेल्या  आधार जेष्ठ
नागरिकांच्या "तीळ गूळ घ्या-गोड गोड बोला"कार्यक्रमात रविवार(ता,२१)रोजी  हास्य-- चुटकुले,पैसा वर कविता,तर शेर -शायरी ची खैरात,कविताचा पाऊस व "जय श्रीराम ,जय श्रीराम"जय घोष करीत वैजापूरच्या जेष्ठ नागरिकांनी लुटला ,प्रभू श्रीरामचंद्र यांच्या अयोध्येतील आगमनाचा आनंद, कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी होते८६वर्षीय सीताराम वामनराव म्हस्के,पाहुणे होते,९३ वर्षीय त्रिंबक विठोबा शेळके,७६वर्षीय फकिरराव काळे,७४ वर्षीय रवींद्र आप्पा साखरे,७५वर्षीय प्रेमसिंग राजपूत,तर८२वर्षीय साहेबराव औताडे(अण्णा,)   आणि ८०वर्षीय मुकुंद शेठ दाभाडे यांनी चुटकुले,कविता, शायरी सादर करून मनसोक्तपणे आनंद लुटत तीळ गुळाचा जेष्ठ कडून स्वीकार करून आनंद लुटला,सर्वप्रथम प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण कऱण्यात येऊन प्रणाम करण्यात आला,अध्यक्ष अण्णासाहेब शेळके,उत्तमराव साळुंके,सचिव घनश्याम वाणी ,पोपटभोसले, दगु वाणी यांनी
आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले,प्रार्थना आसाराम निकम यांनी गायिली,सूत्र संचलन व आभार जेष्ठ नागरिक तथा साहित्यक धोंडीराम सिह 
राजपुत त्यानी केले,प्रास्ताविक उत्तमराव साळुंके यांनी करून अयोध्येतील प्रभू रामचंद्र यांची मूर्ती स्थापन   बाबत माहिती दिली,डिसेंबर व जानेवारी महिन्यात ज्यांचे वाढदिवस होते अशांना शाल,गुलाब पुष्प व नारळ देऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले,या प्रसंगी अली अहमद,नारायण लाडवाणी,भागीनाथ निकम,बी,बी,थोरात,वैजिनाथ मिटकरी,से,नि, पोलीस अधिकारी सोपानराव निकम,बापू गावडे, बबनराव क्षीरसागर अशोक आप्पा पवार एस, डी,त्रिभुवन,यांनी सहभाग नोंदविला आसाराम निकम यांनी खरा तो एकची  धर्म जगाला प्रेम अर्पावे कविता सादर केली तर साळुंके यांनी शेवटी पसायदान सादर केले शेवटी जेष्ठ पत्रकार घनश्याम वाणी यांनी आभार मानले (फोटो कॅप्शन---सीताराम म्हस्के,जेष्ठ  नागरिक साहेबराव औताडे,धोंडीराम राजपूत,घनश्याम वाणी),
 

No comments:

Post a Comment