वैजापूरात आलेल्या दौलताबाद ते शिर्डी पायी साईबाबा पालखी दिंडीचे उस्फुर्त स्वागत वैजापूर - Vaijapur News

Breaking

Thursday, January 4, 2024

वैजापूरात आलेल्या दौलताबाद ते शिर्डी पायी साईबाबा पालखी दिंडीचे उस्फुर्त स्वागत वैजापूर


दौलताबाद येथील साईभक्त मंडळ यांची शिर्डीला जाणारी पायी दिंडी वैजापूर शहरात बुधवार(ता,०४)रोजी येताच शहरातील या पालखीचे स्वागत पालिकेचे माजी नगराध्यक्ष डॉ ,दिनेश परदेशी, संजय राजपूत,सौ,नम्रता राजपूत तसेच काटे मारुती मंडळ,परदेशी गल्ली येथील साईबाबा भक्त मंडळाने बँड पथक, व साईबाबा की जय अशा  जय घोषणा देत केले,  पोष्ट ऑफिस मार्गे जुनी भाजी मंडी, महाराणा प्रताप रोड, परदेशी गल्ली ते काटे मारोती मंदिर पर्यंत  दाराबाहेर सडा, रांगोळ्या,व फुलांची उधळण,व साईबाबांच्या मूर्तीची आरती करत स्वागत महिला व पुरुषांनी स्वागत व आरती केली,रस्त्याच्या दुतर्फा  महिला व पुरुष मंडळींनी साईबाबाचा जय घोष करीत स्वागत केले,या प्रसंगी वैजापूरचे प्रति साईबाबा धोंडीरामसिंह राजपूत यांनी साईबाबांची वेषभूषा धारण करून शिर्डी च्या साईबाबाचे साक्षात दर्शन घडविले, त्यांना अण्णा अधिकार व राजेंद्र वडनेरे यांनी सहकार्य केले,डॉ,दिनेश परदेशी,संजय राजपूत, सागर राजपूत, प्रेम राजपूत,  जितू राजपूत,शुभम राजपूत, रवी लूटे व मित्र मंडळ,परदेशी गल्ली मित्र मंडळ दिनेश राजपूत,रामदास मुरलीधर इंगळे,रवी बाविस्कर,सौं,नम्रता राजपूत,नारायण राजपूत यांनी सहभाग नोंदविला, संजय व सौ ,नम्रता राजपूत गत
१३वर्षांपासून या दिंडीचे स्वागत,त्यांची निवास व्यवस्था, साई महा प्रसाद देऊन सेवा करीत आहेत,
गुरुवारी सकाळी सहा वाजता ही पालखी शिर्डीला रवाना झाली,(फोटो कॅप्शन- दौलताबादहुन शिर्डीला जाणाऱ्या या पायी पालखी चे स्वागत करतांना सागर राजपूत,संजय राजपूत,जितू राजपूत,प्रेम राजपूत,शुभम राजपूत व साईबाबांच्या वेषात धोंडीरामसिंह राजपूत, जितू राजपूत)

No comments:

Post a Comment