वैजापूरातील सुमतीनगर खुल्या जागेवर भिंत बांधकाम, सुशोभिकरणं लोकार्पण संपन्न - Vaijapur News

Breaking

Thursday, January 4, 2024

वैजापूरातील सुमतीनगर खुल्या जागेवर भिंत बांधकाम, सुशोभिकरणं लोकार्पण संपन्न


वैजापूर ता,०५
वैजापूर शहरातील येवला रस्त्यालगत असलेल्या सुमतीनगर येथील खुल्या जागेवर संरक्षक भिंत बांधकाम, तसेच जागेचे सुशोभीकरण,व मंदीर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर लोकार्पण सोहळा गुरुवार(ता,०४)रोजी वैजापूर -गंगापूर तालुक्याचे आमदार प्रा,रमेश पा, बोरनारे , भाजपा सरचिटणीस डॉ,दिनेश परदेशी,बाळासाहेब संचेती,सौ,शिल्पा परदेशी,पालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक भागवत बिघोत-राजपूत,शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र पा,साळुंके,शहर शिवसेना प्रमुख पारस घाटे,भाजपा शहर अध्यक्ष दिनेश राजपूत,यांच्या उपस्थितीत संपन्न झाला, या बांधकामास आ,बोरनारे यांनी आपल्या आमदार निधीतून ५० लक्ष रुपये सुशोभीकरण साठी व २० लक्ष रुपये सामाजिक सभागृहासाठी दिलेले आहेत, या प्रसंगी माजी नगरसेवक शैलेश चव्हाण,स्वप्नील जेजुरकर,सखाहरी बर्डे, सौ,लताबाई मगर,द्वारकाबाई  घाटे,खुशालसिंह राजपूत, ठा,धोंडीरामसिंह राजपूत, ज्ञानेश्वर टेके,भावलाल सोमासे, बजरंग मगर,राजू गायकवाड, श्रीकांत साळुंके,त्रिभुवन बाबा,रामेश्वर गायकवाड, कचरू भोसले, सुनील लाडवाणी,पोपट जाधव, सुनील आहेर,रामकीसन जोरे पाटील,शैलेश पोंदे,प्रकाश पाटील,शंकर जोरे पाटील,शंकर मुळे, संजय खैरनार,डी,एस, गायकवाड, प्रा,श्री ,चव्हाण, यांच्या सह वसाहतीतील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या,या ठिकाणी हभप किसनगिरी महाराज यांच्या नावाने  हरिनाम सप्ताह निमित्त पारायण, काकडा आरती,व कीर्तन ,प्रवचन कार्यक्रम ही सुरु आहे,(फोटो कॅप्शन-आ,रमेश बोरनारे,डॉ,दिनेश परदेशी,बाळासाहेब संचेती,पारस घाटे,राजेंद्र साळुंके,शिल्पा परदेशी व ईतर)
 

No comments:

Post a Comment