भारतीय स्वातंत्र्य दिन सायकलिस्टची आरोग्य जागृती फेरी - Vaijapur News

Breaking

Thursday, August 15, 2024

भारतीय स्वातंत्र्य दिन सायकलिस्टची आरोग्य जागृती फेरी



वैजापूर ता,१६
भारतीय स्वातंत्र्य दिनी गुरुवार(ता,१५)रोजी येथील
सायकलिस्ट व स्वीमिंग ग्रुप च्या वतीने आजच्या नागरिकांना आरोग्य पाठ देण्यासाठी शहर व परिसरातुन सायकलिस्ट व स्वीमिंग ग्रुप च्या वतीने
"सायकल चालवा-आयुष्य वाढवा","देखना है कल तो
चलाओ सायकल"अशा घोषणा देत सायकलिस्ट यांनी
पूर्ण शहरातून सायकल फेरी काढली,
आरंभी  सामाजिक कार्यकर्ते  धोंडीरामसिंह राजपूत यांच्या उपस्थितीत तिरंगा ध्वज सायकलिस्ट यांनी सायकलवर लावले व भारतीय स्वातंत्र्य चा जयघोष केला ,तिरंगी ध्वजला सर्वांनी सलामी दिली, .नंतर डॉ,बाबासाहेब आंबेकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले, पोलीस निरीक्षक श्यामसुंदर  कौठाळे व धोंडीरामसिंह राजपूत यांनी या आरोग्यदायी सायकलिस्ट फेरीला ध्वज दाखवीत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या,वैजापूर स्वच्छता विभाग कर्मचारी यांनीही सकाळी साडेसहा वाजता डॉ,बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला स्वच्छता दूत धोंडीराम राजपूत
यांच्या उपस्थितीत अभिवादन करून भारतीय स्वातंत्र्य दिन घोषणा देऊन तिरंगा ध्वज ला सलामी
दिली,या प्रसंगी सायकलिस्ट व स्वीमिंग ग्रुपचे प्रमुख योगेश गाढे,से,नि, प्राध्यापक ज्ञानेश्वर जाधव,दिलीप अनर्थे,श्री खैरनार,स्वच्छता निरीक्षक प्रमोद निकाळे, रमेश त्रिभुवन ,वाल्मीक शेटे,विष्णू आलूले यांची उपस्थिती होती(स्वातंत्र्य दिनी निघालेल्या सायकल चालवा-आयुष्य वाढवा  फेरीला हिरवा धवज  दाखविण्यात आला)

No comments:

Post a Comment