झाडे लावणे जितके महत्वाचे आहे तेव्हढेच लावलेल्या रोपट्यांचे संरक्षण, संवर्धन व संगोपन महत्वाचे आहे ,यास्तव लावलेली रोपटे जगविण्याचा संकल्प सर्वांनी करावा असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंग राजपूत व सेवानिवृत्त फौजी व वृक्ष मित्र शिवनाथ पा, राहणे यांनी तालुक्यातील चांडगाव येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये प्रसंगी करून वैजापूर तालुक्याचे आमदार प्रा,रमेश पा,बोरनारे यांच्या उपस्थितीत चांडगाव ता,वैजापूर च्या कै,भरत पाटील विद्यालय प्रांगणात वड,पिंपळ,चिंच,आंबा ची ११रोपटी लावून ती जगविण्यासाठी संकल्प केला,
वैजापूर नगर पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी भागवत बिघोत राजपूत यांनी ही रोपटी दिली होती, गावकरी वर्गाने ही एक तरी झाड दरवर्षी लावून ते जगविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करणार असल्याचे वचन दिले, या प्रसंगी सरपंच सौ,मनीषा ठेंगडे, बाबासाहेब जगताप ,अशोक राहणे,संतोष जाधव, राजेंद्र पा, साळुंके,पारस घाटे,भीमराज रहाणे व शाळेतील मुली ही उपस्थित होत्या,चांडगाव शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला,वृक्षमित्र सेवानिवृत्त फौजी शिवनाथ रहाणे यांनी सर्वांना धन्यवाद देत गावकऱ्यांच्या मदतीने आणखी वृक्ष लावून ते जगविण्यासाठी संकल्प केला(फोटो क
कॅप्शन-वडाचे रोपटे लावताना आ,बोरनारे,धोंडीराम
राजपूत, शिवनाथ राहणे,संतोष जाधव)
No comments:
Post a Comment