येथील देशपांडे गल्ली (मुंजाळी)येथील ७०-७५वर्षे पूर्वीच्या श्री,काशीविश्वनाथ महादेव मंदिराचे जीर्णोद्धार करून त्यावर कलश रोहण सोहळा व श्री गणेश व श्री माता पार्वती मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा एका दिमाखदार सोहळ्यात श्रावण पौर्णिमा सोमवार(ता,१९) रोजी दुपारी०२-१० वाजता नाशिक येथील श्री १०८ महंत स्वामी परमेश्वर गिरी महाराज यांच्या हस्ते सम्पन्न झाला,या प्रसंगी शि,म,प,हृदयानंद माऊली महाराज यांची ही उपस्थिती होती,सकाळी ७वाजता श्री कलश मिरवणूक, सकाळी १०-००वाजता कलश पूजा व दुपारी २-१० वाजता वृश्चिक लग्न व नैवद्य - आरती सम्पन्न होऊन कलश सोहळा संपन्न झाला, दोन दिवसीय पूजा पाठ वैजापूर येथील गुरुजी हरीश लालसरे यांनी पार पाडले,या प्रसंगी माजी नगराध्यक्ष डॉ,दिनेश परदेशी यांनी
महाराजांचे पूजन केले,पालिकेच्या सहकार्याने हे मंदिर जीर्णोद्धार झाल्या बद्धल त्यांनी सर्व नगरसेवक यांना धन्यवाद दिले,शिवराणा प्रतिष्ठांण मुंजाळी, व देशपांडे गल्ली तील सर्व नागरिक महिला पुरुष व पंचक्रोशीतील तिल भक्तगण यांनी या प्रसंगी आलेले माजी नगरसेवक दशरथ बनकर,प्रशांत कंगले,गणेश खैरे,दिनेश राजपूत, राजेश गायकवाड, बजरंग मगर,
रमेश हाडोळे, प्रेम राजपूत यांचे स्वागत केले,महाराष्ट्र शासनाने दोन मानाचे पुरस्कार पदमश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड व डॉ,बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन मुख्यमंत्री ना, एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री ना,अजित दादा पवार व समाज कल्याण मंत्री ना ,संजय बनसोड यांच्या हस्ते
सन्मानित झालेले धोंडीरामसिंह राजपूत यांचा विशेष
सत्कार शिवराणा प्रतिष्ठाण च्या वतीने
डॉ,दिनेश परदेशी यांनी केला, या प्रसंगी शहराच्या विविध भागातून भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते,सर्व उपस्थिताना महाप्रसाद वाटप ही करण्यात आले, शिवराणा प्रतिष्ठाण व मुंजाळी -देशपांडे गल्लीतील सर्व सदस्यांनी सहभाग नोंदविला( फोटो कॅप्शन--मंदिरावर कलश चढविल्यानंतर दिसणारे शानदार दृष्य),
No comments:
Post a Comment