स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने नगरपरिषद प्राथमिक शाळा गायकवाड वाडी येथे स्वातंत्र्य दिन ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला,सदर कार्यक्रमास परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते.सदर कार्यक्रम प्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत वैजापूर ग्रामीण एक तर्फे शाळेला विविध वस्तू भेट देण्यात आले तसेच शाळेतील विविध कामांचे लोकार्पण करण्यात आले त्यामध्ये प्लेवर ब्लॉकचे काम , शाळेसाठी एलईडी टीव्ही, शैक्षणिक साहित्य ठेवण्यासाठी रॅक तसेच मुलांसाठी शैक्षणिक उपयुक्त साहित्य वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम प्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत वैजापूर ग्रामीण चे माजी सरपंच दौलत गायकवाड यांच्याद्वारे मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी रुपये सत्तावीसशे रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली .सदर कार्यक्रमास माजी विद्यार्थी तसेच माजी सैनिक यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आले, गावच्या सरपंच कविता गायकवाड, शशिकांत गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, सोमनाथ गायकवाड, विलास गायकवाड,कैलास गायकवाड,रवींद्र गायकवाड,अशोक गायकवाड,संदीप गायकवाड, सचिन गायकवाड, दिनकर गायकवाड,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुफसिल शेख,उपाध्यक्ष पवन गायकवाड,वाल्मीक गायकवाड,जाकीर शेख, इसाक शहा ग्रामविकास अधिकारी रेखा जोशी,ज्येष्ठ शिक्षिका बी . एस.आहेर तसेच माता-पालक संघ सर्व सदस्य पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद राजपूत यांनी केले व उपस्थित यांचे आभार मानून कार्यक्रम कार्यक्रम पूर्णत्वास नेला.
शाळेत एकूण 33 विद्यार्थी असून अनेक विद्यार्थी गुणवत्ता परीक्षेत सहभागी होतात व उत्तीर्णही होतात सदर शाळेत सेमी इंग्लिश माध्यमाची असून शिक्षण दिले जाते, गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे शिक्षक व पालक वर्ग मिळून परिश्रम घेत आहे.
No comments:
Post a Comment