साळी समाजाचे आद्यदैवत वेदमुर्ती भगवान जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा - Vaijapur News

Breaking

Wednesday, August 21, 2024

साळी समाजाचे आद्यदैवत वेदमुर्ती भगवान जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

वैजापूर दि.

वैजापूर येथे साळी समाजाचे आद्यदैवत  वेदमुर्ती भगवान जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला तसेच नगर विकास योजने अंतर्गत वेदमुर्ती भगवान जिव्हेश्वर मंदीर सभागृह बांधकाम २५ लक्ष रूपये खर्चाचे कामाचे भुमीपुजन आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी हे होते.

वेदमुर्ती भगवान जिव्हेश्वर यांच्या जन्मोत्सोवा निमीत्त विठ्ठल रूख्मीणी मंदीर व भगवान जिव्हेश्वर मंदीर येथे भजन, ग्रंथवाचन, आरती, पुजन करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर वैजापूर शहरातील परदेशी गल्ली येथील लोंढे परिवाराच्या वतीने स्व. वेणुबाई शंकरराव लोंढे यांच्या स्मरणार्थ भगवान जिव्हेश्वर मंदीरास देण्यात आलेल्या जागेवर २५ लक्ष रूपये खर्चाचे कामाचे भुमीपुजन आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी भगवान जिव्हेश्वर मंदीराकरीता जागा दिल्या बददल श्रीमती संध्या शरद लोंढे व भरत कोंडाजी लोंढे यांचा आमदार प्रा. रमेश बोरनारे व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी शाल व श्रीफळ देवुन  सत्कार केला.

या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप, शहर प्रमुख पारस घाटे, भा.ज.पा. ओबीसी जिल्हा अध्यक्ष दशरथ बनकर, उद्योजक उमेश वाळेकर, व्यापारी महासंघाचे प्रकाश शेठ बोथरा, समाजसेवक रविंद्र अप्पा साखरे, नगरसेवक डॉ. निलेश भाटीया, ज्ञानेश्वर टेके, स्वप्नील जेजुरकर, गोकुळ भुजबळ, नगरसेवक प्रकाश चव्हाण, सिध्देश्वर साखरे, बंकटसिंग राजपूत, जयसिंग राजपूत, संतोष बाहेती, बाळु आप्पा साखरे, रामदास टेके, मुकुंद दाभाडे, विलास रामेय्या, हरीष लालसरे, सुरज राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे   सुत्रसंचालन अशोक मांजरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करणेसाठी साळी समाजाचे अध्यक्ष समीर लोंढे, योगातज्ञ डॉ. अशोक सरोदे, पोपटराव सरोदे, ध्रुवा गुळस्कर, सुभाष मांजरे , कमलाकर पारे, शितलकुमार रोजेकर, आनिल गुळस्कर, सुनील गुळस्कर, अविनाश कळंके, माणिक सातपुते, रोषन धसे, किशोर आहिरे, धनंजय तांबे, महेश आहिरे, लक्ष्मीकांत कांबळे, मच्छिंद्र आहिरे, अनिल आहिरे, प्रशांत खडमकर, सुमित खडमकर, अश्विन रावकर, सुनिल लोंढे, दिपक कांबळे, संतोष गुळस्कर, रोहित गुळस्कर, ललत लोंढे, गणेश कांबळे, राजेंद्र कांबळे, राजेंद्र पारे, सतिष सातपुते, शुभम पारे, ओमकार सरोदे, अशिष सरोदे, रवि आहिरे, जितु मांजरे, आकाश खडमकर, संतोष आहिरे, संतोष पारे, अमोल सोनटके, संजय आढाव, पप्पु ठोंबरे, महिला मंडळाचे चंद्रकला मांजरे, कमलबाई लोंढे, प्रमिला लोंढे, शंकुतला लोंढे, मंगल सरोदे, सुरेखा आहिरे, सुमन शेरे, माया खडमकर, कांबळे आजी, रत्नमाला आहिरे, ज्योती हांगे, सोनल मांजरे, सारीका लोंढे , यांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment