लोककलावंत सांस्कृतिक मंच मुंबई ,शाखा वैजापूर च्या वतीने मंगळवार(ता,२०) रोजी येथील मुंबई-नागपूर महामार्ग च्या बाजुला असलेल्या ओम साई लान्स येथे महाकवी वामन दादा कर्डक(१०२ वी जयंती) व साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे(१०४ वी)जयंती निमित्ताने लोककलावंत महोत्सव व राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला ,राज्यातील पन्नास कलाकारांच्या कलेचे कौतुक करून शाखेच्या वतीने शाल,स्मृती चिन्ह व श्रीफळ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, तर लोकलावंतांनी वामन दादा कर्डक यांची गीते ,सादर केली,तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची शाहिरी ही शाहिरांनी सादर केली,कार्यक्रम अध्यक्षस्थानी लोककलावंत राज्य शाखेचे अध्यक्ष, कवी,गीतकार ,गायक असलेले विष्णू अण्णा शिंदे होते,स्वागत अध्यक्ष रवींद्र आप्पा साखरे,प्रकाश शेठ बोथरा, माजी आ,भाऊसाहेब पा, चिकटगावकर ,शासनाने दोन मानाचे पुरस्कार देऊन सन्मानित केलेले सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंग राजपूत, माजी अध्यक्ष साहेबराव पा,औताडे, तहसीलदार सुनील सावंत,एकनाथराव त्रिभुवन, आयोजक शाहीर अशोक बागुल, तालुका कलावंत अध्यक्ष बाबासाहेब
गायकवाड, श्री ,बोयनार, से,नि, प्राध्यापक डी,एस, गायकवाड, अशोक तांबूस,आबासाहेब जेजुरकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती,अशोक बागुल यांनी कलावंत उत्सव व कलावंत गुण गौरव सारखे कार्यक्रम यापुढेही चालू ठेऊन , या महान व थोर पुरुषांचे कार्य तळागाळातील घटकापर्यंत पोहचून कला जिवंत ठेवावी असे अनुक्रमे चिकटगावकर व शिंदे यांनी विशद केले,या प्रसंगी पत्रकार दीपक थोरे,सुनील त्रिभुवन, विलास म्हस्के, साहेबराव पडवळ, बाबासाहेब वाघ,राजेंद्र बागुल, विलास रामैय्या, पो,पा, धिवर यांच्या सह शहर व तालुक्यातील कलाकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,आरंभी सर्व थोर महापुरुष व थोर समाजसुधारक याना अभिवादन करण्यात आले,शाहीर अशोक बागुल यांनी प्रास्ताविक केले तर
प्रमोद पठारे यांनी आभार मानले, परभणी, नांदेड व जालना, मुंबई,बीड येथून आलेल्या कलावंतांनी
धोंडीराम राजपूत,बाबासाहेब गायकवाड, अशोक बागुल,आबा जेजुरकर व ईतर)
No comments:
Post a Comment