मराठवाड्याचे जेष्ठ बाल साहित्यिक धोंडीरामसिंह राजपूत यांची "बैल पोळा" ही कविता इंग्रजी माध्यम
च्या इयत्ता ५व्या वर्गाला आहे,पोळ्याच्या पूर्व संध्येवर
त्यांनी शनिवार(त,३१)रोजी येथील सेंट मोनिका इंटरनॅशनल या इंगजी माध्यमाच्या शाळेत पोळ्याच्या
पूर्व संध्येवर शनिवार(ता,३१) रोजी प्रत्यक्ष शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना"बैल पोळा"ही कविता शिकविली.
सेंट मोनिका इंटरनॅशनल स्कुल च्या इयत्ता ५ वि च्या १२५विद्यार्थ्यांना स्वतः कवी आपली कविता शिकवीत आहे, हे पाहून त्यांना खूप आनंद झाला,त्यांच्या चेहऱ्यावर आनंद भरभरून वाहत होता,राजपूत यांनी कविता शिकविण्याआधी पूर्व ज्ञान जागृती करुन कविता प्रथम गायिली व नंतर प्रत्येक कडवे वाचून स्पष्टीकरण केले, विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साह या प्रसंगी दिसून आला,या विद्यालयाच्या प्रमुख माजी नगराध्यक्षा सौ, शिल्पाताई दिनेश भाऊ परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील ही उत्कृष्ट शाळा आहे,या प्रसंगी प्राचार्य किशोर साळुंके व श्रीमती स्वाती खैरनार ही कविता राजपूत यांनी शिकविताना ते प्रत्यक्ष वर्गात बसून त्यांनी अध्यापनाचे निरीक्षण केले, वर्ग शिक्षिक ही उपस्थित होते, (फोटो कॅप्शन, धोंडीरामसिंह राजपूत ,समोर विद्यार्थी वर्ग)
ब
No comments:
Post a Comment