स्वावलंबी बना,-स्वाभिमानाने जगा"हा संदेश घराघरात पोहचविण्यासाठी:अहिल्या संदेश यात्रा - Vaijapur News

Breaking

Sunday, September 1, 2024

स्वावलंबी बना,-स्वाभिमानाने जगा"हा संदेश घराघरात पोहचविण्यासाठी:अहिल्या संदेश यात्रा


वैजापूर ता,०१
वैजापूर -गंगापूर सकल धनगर समाजाच्या वतीने या दोन्ही तालुक्यातील  समाजाला व विशेषतः युवा वर्गाला संघटनातक ऊर्जा व प्रेरणा मिळावी,त्यांनी स्वावलंबी होऊन स्वाभिमानाने जगावे म्हणून  रविवार(ता,०१)रोजी येथील  पुण्यश्लोक अहिल्याबाई
होळकर पुतळ्यापासून "अहिल्या संदेश यात्रा"आरंभ
झाली, पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर  यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रथम त्यांच्या पुतळ्याला गट नेते  दशरथ बनकर,सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंग राजपूत,  बापूसाहेब गावडे ,मनसे प्रमुख सुनिल गायकवाड, बाळासाहेब जानराव,बाबा वाघ,सोपान पगार यांनी पुष्पहार  टाकून अभिवादन केले,रथावरील
अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीलाही  रामनाथ राठोड,प्रभाकर बकले,महेश भालेराव,उत्तमराव पवार,
बिपीन साळे, श्री,उघडे,बाळासाहेब शिंदे,श्री ,साळवे यांनी अभिवादन केले,या सर्वांनी रथासमोर श्रीफळ फोडले,१ सप्टेंबर ते१० सप्टेंबर दरम्याम ही संदेश यात्रा वैजापूर = गंगापूर  तालुक्यातील मोठ्या जवळपास ७० खेडी, वाड्या  वस्त्या येथे  ही संदेश यात्रा जाणार असून या "स्वावलंबी बना-स्वाभिमानाने जगा", हा संदेश देऊन समाजाला जागरूक व संघटीत  होण्याचे आवाहन करणार आहेत,या यात्रेचा
सांगता समारंभ  यात्रा पूर्ण झाल्यावर  ११सप्टेंबर,२०२४,रोजी वैजापूर येथे या संदेश यात्रेचा समापन  समारंभ सकाळी साडे दहा वाजता होणार आहे,याप्रसंगी भूषण गावडे ,श्रीबसवेकर,अदमाने,अशोक देवकर ,यांची उपस्थिती सूत्र संचलन  धोंडीराम ठाकूर यांनी केल,आभार जानराव यांनी मानल ,
ले (फोटो कॅप्शन--  अहिल्यादेवी यांच्या नावाचा जय घोष व अभिवादन करून अहिल्या संदेश यात्रा आरंभ)

No comments:

Post a Comment