वैजापूर उप जिल्हा रुग्णालयात"सामाजिक संरक्षण शिबीर "अंतर्गत विविध योजनांची माहिती - Vaijapur News

Breaking

Wednesday, October 16, 2024

वैजापूर उप जिल्हा रुग्णालयात"सामाजिक संरक्षण शिबीर "अंतर्गत विविध योजनांची माहिती

 
 
वैजापूर ता,१६ 
एचआयव्ही एड्स ग्रस्त किंवा ईतर दुर्धर आजार असलेल्या रुग्णांनी शासनाच्या  विविध सहाय्य योजना,सोयी, सवलतीचा  लाभ घेऊन कौटुंबिक,सामाजिक व आरोग्य विषयक  जीवन सक्षमपणे व आनंदी राहून जगावे असे आवाहन जिल्हा आरोग्य समिती सदस्य व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ठा.धोंडीरामसिंह राजपूत यांनी बुधवार(ता,१६)रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित सामाजिक संरक्षण शिबिरात केले.,सदरील शिबीर महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई,जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष(डापकु)जिल्हा रुग्णालय संभाजीनगर, व उपजिल्हा रुग्णालय वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या विविध योजनांची माहिती एचआयव्ही एड्स बाधित व दुर्धर आजारग्रस्त रुग्णां पर्यंत पोहचावी व त्यांना लाभ व्हावा यासाठी हे शिबीर वैद्यकीय अधीक्षक डॉ,बी,एन, मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालयातील ए,आर,टी सेंटर व आयसीटीसी सेंटर विभागातर्फे आयोजित करण्यात आले होते.धोंडीरामसिंह राजपूत अध्यक्षपदावरून बोलतांना पुढे म्हणाले की,"आरोग्य ही संपत्ती आहे"या सर्वांनीच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी वारंवार तपासणी करून गोळ्या -औषधी घ्यावी. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.दिपमाला परदेशी,डॉ,निलिमा पालवे,डॉ, रेशमा, यांच्या सह उपजिल्हा रुग्णालयाच्या   मुख्य परिचारिका रुख्मिनी गवई,  तसेच छाया केदारे, विजया जंगम ,अंजली गायकवाड,आयसीटीसी प्रमुख विजय पाटील, समन्वयक शशिकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती,डाक कार्यालयाचे पोष्ट मास्टर रवी भोसले,एकात्मिक बाल विकास प्रकल्प चे संतोष जाधव,संरक्षण अधिकारी श्री कदम,एस, टी, विभागाचे
श्री,  गोपाळ पगारे,व आहार तज्ज्ञ श्रीमती उफाडे यांनी आपापल्या विभागाचआपापल्या विभागाची शासन सवलती ची माहिती दिली.शांताराम चव्हाण या दुर्धर आजार पीडिताने आपण या आजारावर कशी मात केली ते विशद केले.
या प्रसंगी उप जिल्हा रुग्णालयाचे सर्वश्री विजय पाटील,शशिकांत पाटील,महेश चौधरी, भारती  पवार,
वैशाली पंडित,विनोद गवई, मनीषा पाटील,बापू वाळके,साईनाथ बारगळ,मनीषा मुळे, पंकज कांबळे,देवयानी पाटील,राजू लाटे, सतीश नरवडे, यांच्या सह आरोग्य कर्मचारी  तसेच जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून आलेले दुर्धर आजार ग्रस्त रुग्ण
मोठया संख्येने उपस्थित होते .सूत्र संचलन किशोर वाघूले यांनी केले आभार शशिकांत पाटील यांनी मानले (फोटो कॅप्शन-धोंडीरामसिंह राजपूत उपस्थित रुग्णांना संबोधित करताना बाजूला वैद्यकीय अधिकारी डॉ, दीपमाला परदेशी,रवी भोसले व ईतर)

No comments:

Post a Comment