देशातील जेष्ठ नागरिकांच्या वाढत्या समस्यांवर शासनाने वेळीच लक्ष द्यावे! - Vaijapur News

Breaking

Sunday, October 20, 2024

देशातील जेष्ठ नागरिकांच्या वाढत्या समस्यांवर शासनाने वेळीच लक्ष द्यावे!

 
वैजापूर ता,२१
देशात १५कोटी पेक्षा अधिकचे जेष्ठ नागरिक आहेत. या जेष्ठ नागरिकांचा राष्ट्र व समाज उभारणीत मोलाचा
वाटा आहे, आज बऱ्याच जेष्ठांनी वयाची सत्तरी-व ऐंशी  गाठली आहे. त्यांना कुटुंबात स्थान मिळेनासे झाले आहे. कुटुंबात त्यांची दमछाक होत आहे.समाजही त्यांच्या कडे दुर्लक्ष करीत आहे. आरोग्याच्या त्यांच्या विविध समस्या दररोज उद्भवत आहेत,समाजातील सर्वच घटकांचे ही त्यांच्या कडे दुर्लक्ष आहे.त्यांच्या साठी असलेल्या कल्याणकारी   योजना त्यांच्या पर्यंत शासकीय कार्यालय पोहचवत नाही.राष्ट्राचा अनमोल ठेवा  असलेल्या देशातील जेष्ठ नागरिकांना आपले शेवटचे दिवस सुखदायी व आरोग्यदायी जावेत म्हणून शासनानेच निराधार जेष्ठ,दुर्लक्षित जेष्ठ, कुटुंब रहित जेष्ठ नागरिक यांच्या पालन पोषणाची जबाबदारी घ्यावी व त्यांचे अंतिम दिवस सुखात जातील या साठी सर्वंकष प्रयत्न करावे.
 अशी मागणी वैजीनाथ जेष्ठ नागरिक सेवा संघाच्या
बैठकीत जेष्ठ नागरिक तथा जेष्ठ समाजसेवक धोंडीरामसिंह राजपूत यांनी रविवार(ता,२०)रोजी केली.बैठकीच्या अध्यक्ष स्थानीं समाजसेवक प्रकाश शेठ बोथरा होते तर प्रमुख पाहुणे चैतन्य जेष्ठ नागरिक सेवा संघाचे साहेबराव साळुंके व उपाध्यक्ष रवींद्र आप्पा साखरे यांची उपस्थिती होती. प्रथम भारत माता पूजन व राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व,लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले,वयाची पंचाहत्तरी, वयाची ८७ ,वयाची ऐंशी ओलांडणारे सर्वश्री रवींद्र आप्पा साखरे, वैजीनाथ आप्पा मिटकरी, सुरेश संत, वसंत ठाकूर,फुलचंद श्रीवास्तव,सेवा निवृत्त प्राचार्य साठे,काशिनाथ शेठ भावसार पी,वाय, चव्हाण,कृष्ण वरखेडे यांचा विशेष सत्कार करून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. या प्रसंगी संपतराव डोंगरे यांनी खरा तो एकची धर्म   व,ज्ञानेश्वर माऊलीचे
पसायदान  सादर केले,जेष्ठ नागरिक बबनराव क्षीरसागर, बाबासाहेब गायकवाड, भगवानसिंह राजपूत, सुरेश संत, अशोक धसे ,गोकूळसिंह राजपूत,अशोक पवार( आप्पा),सुभाष चाफेकर यांनी सहभाग नोंदविला. शेवटी डोंगरे यांनी आभार मानले,(फोटो कॅप्शन-वयाची ८७ वर्ष,व ८० वर्ष गाठणारे सर्वश्री वैजीनाथ मिटकरी, सुरेश संत,रवींद्र अप्पा व अभिष्टचिंतन करतांना प्रकाश शेठ बोथरा व ईतर)

No comments:

Post a Comment